पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/442

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समईची अशा वेगवेगळ्या वाती, या ज्योतींच्या कंपूत सामील होते ‘कविता'; तिनं गाण्याला आपल्या भोवती शालीसारखं लपेटून घेतलंय. कित्येक वर्ष दोघी बिचाया एका म्हातारीच्या पोटात अडकून पडल्या होत्या. म्हातारीनं त्या दुस-या कुणाला सांगितल्या नाहीत म्हणून त्यांना अस्तित्वच नाही. जिवंत होता यावं म्हणून दोघीही पळून आल्या आहेत. आणि गोष्ट सांगताहेत, गाणी गाताहेत. ती राणीची गोष्ट म्हणजे नागमंडल नाटक.
 नागमंडलचा पिंड मला लोककथेचा वाटतो. वनौषधी, नाग, ग्रामपंचायतीनं नागपरीक्षेचं काढलेलं फर्मान या सगळ्या गोष्टी मला एखाद्या आदिम संस्कृतीतल्या वाटल्या.
 माझ्याशी आणि भास्करशी चर्चा करताना गिरीशनं नागमंडलमधल्या दोन नाट्यबिंदूंचा आवर्जून उल्लेख केल्याचं आठवतंय. नाटकाच्या पहिल्याच वाक्यात आपल्याला मरणाचा शाप मिळाला असल्याचं नट सांगतो. हा मृत्यू शारीरिक नसून नटामधल्या ऊर्जेचा, सृजनशीलतेचा तो अपरिहार्य अंत आहे. गिरीशला अभिप्रेत असलेला हा पहिला नाट्यबिंदू. अपण्णा आणि राणी यांचं नातं हा दुसरा. त्या नात्यातून गिरीशला आजच्या मध्यमवर्गीय पती-पत्नीचा नातेसंबंध अधोरेखित करायचा होता. नव-याचं बायकोकडे सततचं दुर्लक्ष आणि त्यामुळे दोघांमध्ये खेळत असलल ताण. नागमंडलला वर्तमानाचा संदर्भ देण्याचा हा प्रयत्न मला फार क्षीण वाटला. ज्योती, नागराज, वनौषधी, कविता, बंदिस्त असलेली राणी व गीत सृजनाच्या क्षयाची धास्ती किंवा मध्यमवर्गीय पती-पत्नीचं नातं हा आजच्या संदर्भातला आशय मांडणं मला जमलं नाही."

 मला मात्र वाटतं की, कार्नाड हे थेट न सांगता सूचकतेनं सुचवित ब-याच गोष्टी प्रेक्षकांच्या तर्क व कल्पना शक्तीवर सोडन देतात. 'नागमंडल' मध्ये राणाचे पान असंच अनेक शक्यता सूचित करणारं आहे. खरंच तिला नव-याचं रूप घेतलेला नागाचं प्रेम व रतीक्रीडा नव-याची नाही हे कधी जाणवलं नसेल का? नागाच अत्यन मुलाकडून ती का करून घेते? येथे राणीचं वर्तन हे निखळ नैतिकतेला बाजूस सारात ते स्वीकारते, तरीही लोकांपुढे प्रेमी असल्यानं - डंख मारणार नाही ही खात्री असल्यामुळे नाग हातात घेते व आपल्या पातिव्रत्याचा निर्वाळा देत म्हणते का, मा नवरा व नागाखेरीज कुणाही पुरुषाला स्पर्श केला नाही. त्यामागे तिच कपट १ फसवणूक असते का? खचितच नाही. कारण तिला फक्त संसारसुख हवे आहे,पुरुषप्रधान चौकटीत पतीपेक्षा अन्य माणसाकडून व्यभिचाराचा शिक्का मारून घेतल्याख मिळणार नसल्यामुळे व बंधन असल्यामुळे नागाचं पतीरूप ती स्वीकारत. हा तिचा वैचारिक बंडखोरी खचितच नाही, पण ती एक निखळ मानवी कृती आहे. हे कानाड़ाना कलात्मकतेनं मांडलं आहे, म्हणून 'नागमंडल' प्रेक्षकप्रिय इ. झालं, अस माझ मत

लक्षदीप ■ ४४१