पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/440

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रंगमंचीय पण देशी क्लृप्ती आहे.
 हे नाटक विख्यात रंगकर्मी विजया मेहतांनी मराठी व जर्मनीत केलं होतं. नाटकाबद्दल आपल्या 'झिम्मा' या आत्मवृत्तात त्यांनी खालीलप्रमाणे विचार व्यक्त केले आहेत, ते फार मार्मिक व सटीक आहेत.
 ‘गिरीशची मूळ संहिता मला आवडली होती. भारतीय पुराणातली एखादी मिथ निवडायची व ती वर्तमानाशी जोडून एक भेदक, रसरशीत अन् सोलीव असा नाट्यानुभव उभा करायचा, हे गिरीशच्या ब-याच नाटकाचं मर्म. व्यासंग, नाट्यलेखनाचा सधन समज आणि शैली या गुणांमुळे गिरीशचं नाटक रंगमचांवर समर्थपणे उभं राहतं.' (पृष्ठ ३१९)
 "अंधारात मस्तकांची अदलाबदल होते. पद्मिनी आता कुणाची पत्नी? देवदत्ताच मस्तक धारण करणाच्या कपिलची? की कपिलचं मस्तक असलेल्या अशक्त दुर्बल देवदत्तची? डोकं हे माणसाचं सर्वात महत्त्वाचं इंद्रिय म्हणून पद्मिनी पतीचं (देवदत्तचं) मस्तक असलेल्या बलवान कपिलची बायको होते. जीवदान मिळालेले दोन्ही मित्र अपूर्णच राहतात. पद्मिनीचा संपूर्ण पुरुषाचा शोधही निष्फळ ठरतो.”
 “विषय शतकानुशतके महत्त्वाचा वाटणारा - पुरातन काळापासून युगापर्यंत अव्याहत चाललेला शोध - मानवाच्या पूर्णतेचा आणि तो न मिळाल्याने वाटणाच्या असमाधानाचा. (पृष्ठ ३२०)"
 एम. के. नाईक हे "From the horse's mouth : A study of Hayavadana (Dimensions of Indian English Literature) मध्ये म्हणतात, "Padmin plight suggest women's in vain attempt to unite man as intellect and as flesh in order to further her creative purpose. But these two aspects of masculine personality are basically at war with each other and hence the attempt ends disastrously in distruction IOT woman and man."
 दुसरे अभ्यासक आर. एस. शर्मा म्हणतात, "Padmini's predicament is a predicament of a modern, emancipated women in our society Who is torn between two polarities, a women who loves her husband well as someone else for two different aspect of their personalitics"
 "In socio-cultural level the play suggests that the Apollonian always asserts it and subdues the Dinyasian in our socio-culture life."

 ‘हयवदन' नंतर पाठोपाठ गिरीश कार्नाडांचे ‘नागमंडल' हे मिथकावर आधारित नाटक आले. यात त्यांनी दोन मिथ-कथांची कौशल्याने सांगड घालीत नाटक पर

लक्षदीप ■ ४३९