पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/433

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिली, पण त्यातही नवी दृष्टी व प्रयोगशीलता दिसते. त्यामुळे गिरीश कार्नाड हे। एक महत्त्वाचे भारतीय नाटककार आहेत. उणीपुरी १३ नाटके लिहूनही त्यांचा प्रभाव भारतभर जाणवतो, तसेच काही प्रमाणात जगभरही. ही त्यांच्या लेखनाची अपूर्व किमया म्हणली पाहिजे.
 गिरीश कार्नाडांची मातृभाषा कोकणी, व महत्त्वाकांक्षा साहित्यात जागतिक कीर्ती मिळविण्याची असल्याने इंग्रजीत लेखन करण्याची महत्त्वकांक्षा असताना त्यांना पाहिलं नाटके लिहिलं ते कानडीमध्ये ‘ययाती' - जी त्यांची संस्कारित भाषा होती... Three Play या पुस्तकात author's introduction मध्ये त्यांनी स्वत: असं म्हणलं आहे की,
 While still preparing for the Oxford trip, amidst the intense emotional turmoil, I found myself writing a play. This took me by surprise, for I had fancied myself a poet, had written poetry through my teens, and had trained myself to write in English, in preparation for the conquest of the west. But here I was writing a play and in Kannad, too, the language of my childhood. A greater surprise was the theme of the play, for it was taken from ancient Indian mythology from which I had believed myself alienated. ("Author's Introduction" Three Plays. 2-3)
 आणि ऑक्सफर्डहून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतताना त्यांच्या मनात भावी नाट्य कारकिर्दीची स्वप्ने होती. त्यावेळी भारतात नुकतीच नव्यानं सांस्कृतिक जीवनाला सुरुवात झाली होती. (सन १९६३) आर्थिक दृष्ट्या राष्ट्र डळमळत असलं तरी, सिनेमा, रंगभूमी, साहित्य, कलाजगतात एकामागे एक दरवाजे उघडत होते. त्यांच्यामागून अनंत हातांनी मला बोलवत असलेल्या असंख्य संधींची जाणीव नसतानाच मी भारतात जाऊन ठेपलो.' (खेळता खेळता आयुष्य (आत्मचरित्र) पृष्ठ १५५)
 त्यानंतर दर दोन-चार वर्षांनी गिरीश कर्नाडांची एकपेक्षा एक सरस व नवा अपूर्व प्रयोगीय अनुभव देणारी नाटके कन्नड व भारतीय भाषात रंगभूमीवर येत राहिली. तो सिलसिला आजही कायम आहे.
 आता त्यांच्या नाट्यकृतीचं साहित्यिक मर्म आणि प्रयोगात्मता मी एका लेखाच्या मर्यादेत संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी काही प्रारंभिक निरीक्षणे नोंदवणे योग्य राहील.

 डॉ. कृष्णा सिंग यांनी 'Girish Karnad : A Man and Artist - Evolution of his dramatic Genius' मध्ये असं मत नोंदवलं आहे की, जेव्हा कार्नाडांनी लिखाणास १९६० च्या दशकाला प्रारंभ केला त्यावेळी ऑक्सफर्डमधील शैक्षणिक

४३२ ■ लक्षदीप