पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/434

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वातावरणामुळे ते पाश्चात्त्य साहित्याच्या नवनिर्माणामुळे (Renaissance) मुळे प्रभावित झाले होते. त्यांच्या साहित्यिक जडणघडणीच्या काळात विविध प्रभाव त्यांना आकर्षित करून गेले होते. बालपणी शिरशी (कर्नाटक) मध्ये जशी त्यांनी नाटक कंपन्यांची प्रोसेनियम पद्धतीची नाटके पाहिली, तशीच यक्षगान परंपरेची नाटकेही पाहिली. त्यांना इब्सेन व जॉर्ज बर्नाड शॉ च्या नाटकांनीही प्रभावित केलं होतं. आणि कोणताही महत्त्वाचा नाटककार शेक्सपिअरच्या प्रभावातून कसा सुटेल? कार्नाडही त्याला अपवाद नव्हते. पण सर्वात कन्नड रंगभूमीचा खोल प्रभाव त्यांच्या मनात होता. आपल्या नाटकाच्या जडणघडणीबद्दल ते Thee plays च्या प्रस्तावनेत लिहितात,
 My generation was the first to come of age after India became independent of British rule. It therefore had to face a situation in which tension implicit until then had come out in the open and demanded to be resolved without apologia or self justification, tensions between the cultural past of the country and its colonial past, between the attractions of Western modes of thought and our own traditions, and finally between the various visions of the future that openeduP Once the common cause of politicall freedom was achieved. This Is the historical context that gave rise to my plays and those 01 contemporaries. ("Author's Introduction" Three Plays.)

दोन
पुराणकथेचे आधुनिक अन्वयार्थ . 'ययाती' व 'अग्नीवर्षा'


 गिरीश कर्नाडांचे पहिले नाटक म्हणजे 'ययाती.' त्याचं कथानक वि. स. खांडेकरांच्या 'ययाती' या गाजलेल्या कादंबरीमुळे मराठी रसिकांना परिचित आहे. त्यांनी ययाती व कच या दोघांद्वारे भोग व त्यागाचे द्वंद गांधीवादाच्या प्रभावामधून समर्थपणे मांडले होते. परंतु कार्नाडांची साहित्यिक संवेदनशीलता भिन्न आहे. ती अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारी आहे. ययातीचं वृद्धत्व पुरूने घेतल्यावर त्याच्या नवविवाहित पत्नीचा प्रश्न कार्नाडांना संत्रस्त करतो. जरी कथानक पुराणातले सर्वपाराचत असलं तरी त्याला कर्नाडांनी आजच्या काळाशी सुसंगत असा नवा अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या वर्तमानाची प्रस्ततता ही ययाती-चित्रलेखाच्या संवादातून त्यांनी नेमकेपणाने मांडली आहे. चित्रलेखा हे या नाटकातले पात्र नाटकाला नव आयाम देते. ती वृद्ध पुरूला पती म्हणून स्वीकारू शकत नाही व ययातापुढे सासच्यापुढे धीटपणे, म्हणते की, “मी पुरूशी लग्न केलं ते तो तरुण आहे म्हणून तो माझ्या पोटात भारताचा वंश पुढे नेण्यासाठी बीजारोपण करेल म्हणून, पण आता तो ती क्षमता गमावून बसला आहे. ज्यासाठी त्याच्याशी माझा विवाह झाला, त्यातले

लक्षदीप ■ ४३३