पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/432

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलाखत, ‘ययाती' वरचा त्यांचा मास्टर क्लास, काही सिनेमा व काही नाटकांच्या चित्रफिती प्रदर्शन व त्यांच्या प्रकट मुलाखतीनं साजरा झाला होता. त्याला मी स्वत: उपस्थित होतो, आणि तीन दिवसात मराठी रंगभूमी व साहित्याचे Whos Who म्हणता येतील अशा अनेक प्रसिद्ध लेखक व कलावंतांनी हजेरी लावली होती. हे त्यांचे नाटककार म्हणून महत्त्व व प्रभाव स्पष्ट करायला पुरेसं आहे. त्यांच्या प्रत्येक नाटकाची इंग्रजीतून विपुल व विविध अंगानी साक्षेपी व चोखंदळ समीक्षा झाली आहे. १९९९ साली त्यांना ज्ञानपीठानं सन्मानित केलं गेलं, तेव्हा आपण सर्व मराठी जनांना हा मान वय, नाट्यकृती व संख्येने जास्त लेखन असलेल्या विजय तेंडुलकरांना मिळायला हवा होता, असं वाटलं होतं. त्यांना त्याच्या समकक्ष सरस्वती सन्मान मिळाला होता आणि असा प्रवाद आहे की, सरस्वती व ज्ञानपीठ सन्मानाच्या संचालकांमध्ये स्पर्धा व चुरस असल्यामुळे एकाला दोन्ही सन्मान मिळत नाहीत. खरे खोटे मी जाणकारांवर सोडतो. असो. खुद्द कर्नाडांनीही पण अशीच प्रतिक्रिया दिला होती. तरी कर्नाड त्या बहुमानास प्राप्त होते हे नि:संशय.

 गिरीश कार्नाडांचं आधुनिक भारतीय नाटककार म्हणून महत्त्व कशासाठी आहे याचा विचार करता हे लक्षात येते की, ते ज्यावेळी लिहायला लागले १९६० च्या दशकात व त्यचं पाहिलं नाटक 'ययाती' हे १९६१ मध्ये आलं तोवर भारतीय रंगभूमीनं पूर्णपणे प्रोसेनियम नाट्यपद्धत स्वीकारली होती, मराठी-मध्ये विशेषत्वान. पण कार्नाडांनी 'ययाती' ते 'बळी' या पन्नास वर्षाच्या नाट्यलेखन प्रवासात लोकरंगभूमीचा, कन्नडमधील यक्षगान नृत्यनाट्य परंपरेचा वापर करीत व पुराणे, मिथके व इतिहासातून कथाबीज निवडून, त्यांना आधुनिक संवेदनशीलतेची जोड देऊन एक संपन्न व अथर्गन अस्सल भारतीय नाट्यकलेचा सुगंध प्रयोगातून दिला, त्याचमुळे जेव्हा त्याचा नाटक इतर भारतीय भाषा व इंग्रजीतून आली व जगातही अनेक ठिकाणी प्रयोगात झाला, तेव्हा प्रेक्षकांना भारताच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा नवा रसरशीत अनुभव आस्वादाचा मिळाला. तेंडुलकरांसह इतर भारतीय नाटककरांच्या नाटकांचे विषय, पात्रे व समस्या या वर्तमानातल्या होत्या, प्रयोग प्रोसेनियम ते प्रायोगिक या सीमारेषेत होते. क्वाचित प्रसंगी हबीब तन्वीर सारख्यांनी ही चौकट मोडली. तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल मध्ये दशावतारी प्रयोगाला नवं वळणं दिलं, पण कर्नाडांनी हे सातत्याने क 'ययाती' ‘अग्नीवर्षा' (अग्नीमत्तु मुळे) ही पौराणिक; ‘हयवदन’ ‘नागमंडल 'बळी " मिथकप्रेरित नाटके: ‘तुघलक’ ‘तलेदंडा' (रक्तकल्याण) आणि ‘टिपूसुलतानचा स्व (टिपू सुलतान कंड कनसू) सारखी ऐतिहासिक नाटके भारतीय कन्नड लोकस व नृत्य-नाट्याच्या फॉर्मचा कल्पकतेने नव्या स्वरूपात वापर करून लिहिला. हा वेगळेपण भारतीय नाटककारात उठन दिसते. प्रकर्षाने जाणवते. अलीकडे त्यांनी 'वेडींग अल्बम’ ‘ब्रोकन इमेजेस' व 'उणेपूरे शहर एक' सारखी आजची नाटक

लक्षदीप ■ ४३१