पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/401

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यातल्या काही ओळी फारच उद्बोधक व प्रभावी आहेत -

‘अल्लाह और रसुल का फरमान इश्क है
यानी के कुराण इश्क है, हबीब इश्क है।
गौतम और इसा का अरमान इश्क है."

 हिंदू-मुस्लीम व इतर सर्व धर्माच्या तत्त्वज्ञानाचं सारच मुळी 'इश्क' आहे. कारण :

‘क्यों की खुदा बंदेसे खुद करते है इश्क'

 अशी मोहम्मद रफीच्या आवाजातली तार सप्तकात फिरणारी तान कानावर पडली आणि मी रोमांचित झालो. मीही त्या कव्वालीला ताल धरू लागलो.

'ये इश्क इश्क है, इश्क, इश्क'

 आणि बंद नजरेसमोरून देवबंद दारुल उलुमचे कोवळे विद्यार्थी, तेथील मौलिक ग्रंथालय आणि देखणी भव्य संगमरवरी मशिदीचा इमारतीचा कोलाज फिरत होता. साहिरच्या ओळी त्या पाश्र्वभूमीवर अधिकच अर्थपूर्ण वाटत होत्या.

'अल्लाह और रसुल का फरमन इश्क हैं,
यानी के कुराण इश्क है, हबीब इश्क हैं,
गौतम और इसका अरमान इश्क है,
ये इश्क इश्क है, इश्क इश्क.'
०-०-०
४०० ■ लक्षदीप