पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/402

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. काश्मीरियत : एक तत्त्वज्ञान, एक जीवनशैली!
 साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १९९४-९५ साल असेल. तेव्हा परभणीला ‘रोजा' या सिनेमाचा निमंत्रितांसाठी एक खास खेळ झाला होता. सिनेमा पहिल्यावर पत्रकारांनी मला प्रतिक्रिया विचारली असता मी उत्स्फूर्तपणे बोलून गेलो होतो.
 'काश्मीर' हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो आपल्या ‘गंगा - जमनी' संस्कृतीचा एक झगमगता रत्नजडीत हार आहे. भारतमातेचा मुकुटमणी आहे.'
 हे आठवायचं कारण म्हणजे जम्मूमधील वैष्णोदेवीची यात्रा आटोपून आम्ही काश्मीरला आलो होतो. श्रीनगरच्या विमानतळावरून टॅक्सीनं ‘दाल लेक’ येथे आरक्षित केलेल्या ‘गुलिस्तान' नामक शिकाच्याकडे जात असताना ड्रायव्हरनं टेप लावला होता, त्यावर ‘रोजा' ची गाणी वाजत होती. ‘क्या म्युझिक डायरेक्टर हैं साब. पूछो मत.' तो म्हणत होता. त्यावरून मला हा प्रसंग आठवला.

 त्यानंतर केव्हा तरी ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' या अफगाणिस्तानच्या पाश्र्वभूमीवरील धार्मिक दहशतवादाचा वेध घेणाच्या कादंबरीचं लेखन चालू असताना काश्मीर समस्येवर कादंबरी लिहिण्याचं मला सुचलं. नुसतं सुचलं नाही, तर त्यानं पार झपाटून. गेलो आणि या विषयाचा अभ्यास सुरू केला. काश्मीर संदर्भात सर्वप्रथम वाचलं ते शेषराव मोरे याचं ‘काश्मीर - एक शापित नंदनवन' हे पुस्तक. तेव्हा माझी ‘रोजा’ सिनेमा पाहिल्यावरची ही प्रतिक्रिया मलाच काहीशी भाबडी व रोमॅटिक - काव्यमय वाटली. कारण ज्या तत्त्वाच्या आधारे भारताची फाळणी झाली, त्या आधारे काश्मीर हे पाकिस्तानमध्ये जायला पाहिजे होतं, असं त्यावेळी अनेकांचं मत होतं, पण काश्मीरवर जेव्हा १९४८ साली हल्ला झाला व पाकिस्तानी सैन्य व कबिलेवाल्यांनी जे अत्याचार व लुटालूट केली, त्यामुळे महाराजा हरिसिंग व शेख अब्दुल्ला या दोघांनीही भारतासोबतच्या विलीनीकरणावर स्वाक्षरी केली आणि मग भारतानं सैन्य पाठवून काश्मीर खोरं मुक्त केलं. पण आज ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर (पाक ऑक्यूपाइड काश्मीर) म्हणतो ते झेलमचं खोरं मुक्त करण्यापूर्वी युद्धबंदी पुकारून

लक्षदीप ■ ४०१