पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/395

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महासत्ता आहे. जागतिक राजकारणाची घडी अमेरिकन हितसंवर्धनाच्या चौकटीत बसण्यासाठी इतर देशात अतिक्रमण करण्याचा ‘आम्हास अधिकार आहे' (जो इतरांनी वापरण्यास त्यांची हरकत असते.) असं मानीत अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराक यथे घुसखोरी करून पुकारलेलं ‘वॉर अगेन्स्ट टेररिझम' इस्लाम केंद्रित आहे, असं जगभरचा बहुसंख्य मुस्लीम समाज मानतो, तेही अमेरिकाद्वेषाचे एक कारण आहे. खरं तर आज अनेक अमेरिकन विचारवंत व्हाय पीपल ऑल ओव्हर दि वर्ल्ड हेट अमेरिका?' असा प्रश्न उपस्थित करून अभ्यास करीत आहेत. पण लोकशाहीवादी अमेरिकन समाज वेगळा आणि जागतिक सत्ताकारण करणारे अमेरिकन सरकार वेगळं; तिथं कोणताही पक्ष-रिपब्लिकन किंवा डिमोक्रेटिक - सत्तेवर आला तरी फारसा फरक पडत नाही. असो. या अमेरिकेबाबत वाटणा-या अप्रीतीचं मूळ मुफ्तीच्या प्रवचनात उमटलं होतं.
 मी मशिदीतून बाहेर पडलो आणि मदरसा काळजीपूर्वक फिरून पाहिला. तिथं दररोज ७५०० पेक्षा जास्त शिक्षण घेणारे विद्यार्थी व पूर्णवेळ काम करणारे सुमारे ५०० अधिकारी, कर्मचारी, व्यवस्थापक आणि धर्मगुरूचा अखंड राबता असतो.सर्वांची मोफत राहण्याची, भोजन व शिक्षणाची सोय केली जाते. मुख्य म्हणजे 'दारुल उलुम' हे सारकारी अनुदान घेत नाही. सारा खर्च देणग्यांतून भागवला जातो. जवळचे शेतकरी व व्यापारी भोजनासाठी धान्य, गूळ, साखर, मीठ व मसाले देतात. तसेच देशातून वे जगभरातून देणग्यांचा अखंड ओघ इथं वाहत असतो. संगरवरी भव्य मशिदीची निर्मितीही देणग्यातून झाली आहे, असं समजलं. त्यावरून मिळणाच्या देणग्यांचा अंदाज करता येतो.
 “दारुल उलुम चा भटारखानाहीं प्रचंड आहे. रोज सात-आठ हजार विद्याथ्र्याचं जेवण तयार करणं सोपं नाही. जेवण साधंच असतं. अधून मधून व इस्लामी सणासुदीला सामिष व गोड जेवण दिलं जातं.
 मला 'दारुल उलुम'मधून फिरताना प्रकर्षाने जाणवला तो साधेपणा, शुद्ध व साधं धार्मिक जीवन व चाकोरीबद्ध दिनक्रम. रोज सहा सात तास (दोन सत्रात) धर्मनिशिक्षण, त्यात पाच वेळा नमाज पढणं, दुपारी विश्रांती व अभ्यास, सायंकाळी थोडं खेळणं, तिथं सिनेमा, संगीत, टी. व्ही. ला स्थान नाही.
 इस्लामी धर्मशास्त्राच्या शिक्षणात प्रामुख्याने पवित्र कुराण, हादीस आणि फिकह यांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यात पुढे पुढे अरबी काव्यशास्त्र, तफसिर, व्याकरण, सिंटॅक्स, लेक्सिकन आणि इतिहासाची भर पडली. वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि काही ग्रीक विज्ञानाचाही अभ्यासक्रमात समावेश केला गेला.

 "दारुल उलुम'मधील आजचा प्रचलित अभ्यासक्रम हा आठ वर्षांचा आहे. मुल्ला निझामुद्दीन सहलवी यांनी अठराव्या शतकात (बाराव्या हिजरी शतकात) तयार

३९४ ■ लक्षदीप