पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास देवबंदला पोहोचलो आणि तेथे तीन तास घालवले. त्या तीन तासांत मला मुस्लीम समाजमन व धर्माबाबत बरंच काही कळलं.माझं मुस्लीम मनाचं आकलन काही प्रमाणात वाढलं, हे नक्की.
 भारतातल्या कोणत्याही तालुका मुख्यालयाप्रमाणे असलेलं, अस्ताव्यस्त पसरलेलं व ग्रामीण बाज वागवणारं देवबंद हे गाव, नगरपालिका असल्याच्या कोणत्याही खुणा दिसू नयेत, इतकं धुळीनं भरलेलं व बरंचसं अस्वच्छ असलेलं गाव. पण गावाच्या एका बाजूस वसलेलं देवबंदचं ‘दारुल उलुम नजरेत येऊ लागले आणि मग वेगळंच विश्व नजरेसमोर उलगडत गेलं. त्याची पहिली खूण म्हणजे स्वच्छता आणि पांढरा शुभ्र पठाणी ड्रेस वा पायजमा - कुडता आणि जाळीदार टोपी घातलेल्या दाढीधारी मुस्लिमाचं साम्राज्य. इथं स्त्रियांना पूर्णतः मज्जाव होता. दुरूनच भव्य संगमरवरी मशिदीचे घुमट दिसत होते. अत्यंत देखणे, कलात्मक व सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकणारे. अब्दुल्लानं माहिती दिली, “सर, अलीकडेच ही भव्य मशीद बांधून पूर्ण झाली आहे. आज इथं वार्षिक जलसा आहे.”
 दारुल उलुमच्या कार्यालयाच्या दोन-चार पदाधिका-यांनी आमचं स्वागत केलं. पूर्ण परिसराची एक चक्कर मारून पाहायची आहे, असं त्यांना मी सांगितलं. त्यांनी आनंदानं होकार दिला. मी महाराष्ट्रातून आलो आहे व माझा मुस्लीम धर्माचा अभ्यास आहे, मी मराठीतून कुराण व इंग्रजीतून हदिस वाचलं आहे, हे अब्दुल्लाकडून समजल्यावर त्यांना अधिकच आनंद झाल्याचं त्यांच्या चमकलेल्या नजरेवरून मला जाणवलं. त्यांनी मिरजच्या इस्लामिक केंद्राची आठवण काढली. तेव्हा मी त्यांना मागील दोन वर्ष सांगलीलाच जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत होतो त्या वेळी मिरजेच्या दग्र्याला भेट दिल्याचं सांगितलं. पण तेथील उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारा वार्षिक शास्त्रीय संगीताचा जलसा व सतारनिर्मिती केंद्राचा उल्लेख करताच त्यांचे चेहरे कोरे झाले. एकाच्या कपाळावरची नाराजीची आठी मी नजरेनं टिपली आणि लक्षात आलं की, प्युरिटन मस्लिमांना संगीत निषिद्ध वाटतं. देवबंद व जिथं मी उभा होतो, त्या ‘दारुल उलुम' या इस्लामिक मदरशामध्ये त्याचा उल्लेख करणं योग्य नव्हतं. त्यामुळे की काय, विषय बदलत त्यांना दारुल उलुमची स्वापना कोणत्या परिस्थितीत झाली हे विचारलं. तसं त्यांनी खुलून सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली.

 "सर, वो बडा पाक दिन था, जब इस मदरसे की नींव डाली गयी. तफसिरसे बतावू तो, तो जुमेरात याने गुरुवार का दिन था. तारीख थी पंधरा मोहरम १२८३ हिजरी याने की बीस मई १८६६. बस, एक उस्ताद थे और एक शागीर्द. इत्तेफाककी बात देखो, दोनोका, नाम मोहमद था. बडा पाक नाम. हजरत साब का जो है. पुरी अल्लाकी मेहेरबानी थी, इसलिए सौ सालमें ये दुनियाँ का सबसे बडा इस्लामिक सेंटर

लक्षदीप ■ ३९१