पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/391

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. देवबंदचं दारुल उलुम

 तीन महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुजफ्फरनगरला माझ्यासोबत निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले मध्यप्रदेश केडरचे सहकार आयुक्त प्रभात पाराशर याच्या सोबत त्यांच्या प्रधान सचिवांना भेटलो, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, “यू मस्ट सी देवबंद सेमेनरी. प्रशासनात काम करताना मुस्लीम प्रश्न हाताळावाच लागतो. त्यांचं सायकिक समजून घेण्यासाठी देवबंदी चळवळ माहीत असणं आवश्यक आहे. ‘इट विल बी अॅन आय ओपनर फॉर यू... यू मस्ट गो."
 देवबंद, उत्तर प्रदेशमधील सहारणपूर जिल्ह्यातील एक छोटसं तहसील मुख्यालयाचं गाव. जिथं आम्हाला विधानसभा निवडणुकीसाठी व मतमोजणीसाठी दोन टप्प्यात एक महिना राहायचं होतं. मुजफ्फरनगरपासून ते अवघ्या ४० कि. मी. अंतरावर होतं. अफगाणिस्तानवरील ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी लिहिताना मुस्लीम धर्माचा अभ्यास करत असताना देवबंदच्या दारुल उलूमचा संदर्भ विविध संदर्भग्रंथ व लेखांमधून यायचा. कैरोच्या अल अझरच्या तोडीचं हे केंद्र मानलं जातं. धर्मशिक्षण, प्रचार व प्रसाराचे जागतिक कीर्तीचं केंद्र म्हणून मुस्लीम जगतात देवबंदला मानाचे स्थान मिळालेलं आहे. ही एका अर्थाने विशाल अशी मदरसा (धर्म; शिक्षणाची शाळा) आहे.तसंच ते इस्लामचं विश्वविद्यालय व जागतिक अभ्यासकेंद्रही आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर परतताना देवबंदला जायचं मी ठरवलं होतं. त्याला मध्यप्रदेशच्या प्रधान सचिवांनी ‘यू मस्ट गो' म्हणून पुष्टीच दिली होती.
 प्रभात पाराशरनी बाहेर पडल्यावर सांगितलं. ‘लक्ष्मीकांतजी, इनकी बिवी मुस्लीम हैं, और ये हमेशा हर जगा मस्जिद और मदरसे जाते रहते हैं. वो छोड़ दो,एक खास बात आहे, मॅडमच्या हातच्या नॉनव्हेज बिर्याणीची लज्जत काही और आहे."

 माझ्यासोबत पाराशर देवबंदला आले नाहीत. निवडणुकीत माझ्या हाताखाली काम करणारा अब्दुल नावाचा एक नायब तहसीलदार देवबंदचा होता, त्याला घेऊन

३९० ।■ लक्षदीप