पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(i.e.I.C.S) as they used to talk in old fashion when 50 or 60 percent were British elements who dominated the service and our (Indian) members of the service had hardly any freedom to express their opinion and they were not independent. Today, my secretary can write a note opposite to my views, I have given that freedom to all my secretaries. I have told them. "If you do not give your honest opinion for fear that it will displease your minister, please then you had beetter to go, I bring another secretary," I will never be displeased over a frank expression of opinion. That is what the Britishers were doing with the Britishers."
 पण तेव्हा काय परिस्थिती होती व आज काय आहे? पुन्हा सरदार पटेलांच्या त्या ऐतिहासिक भाषणातला हा उतारा पाहा.
 "If you are premier, it would be your duty to allow your secretary or chief Secretary, or other services working under you to express their opinion without fear or fever. But I see a tendency today that in several provinces the service are set upon and told," No, you are service man, you must carry out our orders." The Union will go - you will not have a united India, If you have not a good All India Servics which has the independece to speak out its mind. which has a sense of security that you will stand by them."
 आता वाचकांच्या लक्षात आले असेल की मी उफराट्या क्रमाने आधी निदान, मग दुखणे का सांगितले. सरदार पटेल ज्या पद्धतीने नोकरशहांकडून कामाची, निर्भय व स्वतंत्र विचारांची अपेक्षा करीत होते, तसे त्या वेळी प्रांतिक व देशपातळीवरचे बहुसंख्य नेते वागत नव्हते. ब्यूरॉक्रसी ही केवळ आज्ञापालनासाठी आहे असे ते मानत होते. आणि आज तरी काय स्थिती आहे? सुज्ञास सांगणे न लगे.

 सरदार पटेल व नेहरूंसारख्या नेत्यांमुळे स्वातंत्र्योत्तर पहिल्या दोन तीन दशकांत ब्यूरॉक्रसी ही खरेच निर्भीड व स्वतंत्र होती. आपले मत व विचार "without fear of favour" नोंदवत होती व तिचा नेत्यांकडून आदरही केला जात होता, आजही राम प्रधानांसारखे जुने सनदी अधिकारी यशवंतराव चव्हाणांसारख्या जाणत्या नेत्याबद्दल, (ते जाऊनही अनेक वर्षे झाली तरी) भरभरून बोलत असतात, कारण त्यांनी प्रधानांसारख्या अधिका-यांना हे स्वातंत्र्य दिले होते. त्यांच्या अभ्यासू मताची ते कदर करीत होते, बूज राखीत होते. आजचे चित्र काही सन्माननीय अपवाद वगळता विपरीत आहे.

लक्षदीप ■ ३५५