पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

difficult period (i.e. Transfer of power, partition and abolishing and integrating 550 princely states with Indian Union). I am speaking with a sense of heavey responsibility - and I must confess that in point of patriotism, in point of loyality, in point of sincerity and in point of ability you can not have a substitute. They are as good as ourselves, and to speak of them in disparaging terms in this house. in public, and to criticise them in the manner, is doing disservice to yourselves and to the country. This is (my) considered opinion." (टीप : कंसातील शब्द माझे आहे. वाचकांना संदर्भ समजावा म्हणून.)
 आम्हा नोकरशहांची स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षातील वाटचालीतील हीच व्यथा आहे की, भारताने जी प्रगती केली त्यातील जो रास्त व न्याय्य वाटा इंडियन ब्यूरॉक्रसीने उचलला, तिची जाणीव जशी नेत्यांना नाही, तशीच भारतीय नागरिकांनाही नाही. पहिल्या अध्यायाची सुरुवात करतानाच मी नमूद केले होते की, शब्दकोशातली यच्चयावत दुषणे ब्यूरॉक्रसीला दिली जातात, त्यात सत्यांश जरूर आहे, पण जर खरेच ब्यूरॉक्रसी एवढी कुचकामी व बदनाम आहे, तर ती पूर्णतः रद्द करून नवा पर्याय भारतीय राज्यकर्त्यांनी तेव्हा का शोधला नाही? आणि आजही तसा विचार का केला जात नाही? तेव्हा सरदार पटेलांनी देशाची अखंडता व एकात्मता टिकवायची असेल तर अखिल भारतीय स्वरूपाची प्रशासन सेवा हवीच ही भूमिका ठामपणे घेतली होती. आणि ती त्यांच्या नैतिक प्रभावाने, अभ्यास व अनुभवसिद्ध मताने मान्य केली होती. पण नंतर पंडित नेहरू व शास्त्री यांनी 'आमची सर्वांत मोठी चूक म्हणजे आम्ही भारतीय नोकरशाहीमध्ये बदल केला नाही' असे म्हटले तरी नेहरूंना आपल्या सतरा वर्षांच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत ते सहज शक्य होते. त्यांना खरेच का ब्यूरॉक्रसीची उपयुक्तता व देशाच्या एकात्मतेसाठी तिची आवश्यकता पटत नव्हती? याचे आजही समाधानकारक उत्तर सापडत नाही. आज डॉ. मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांनीच भारताला दुसरे (आर्थिक) स्वातंत्र्य १९९१ नंतर ज्या सुधारणा केल्या त्यामुळे - दिले असे मानले जाते. ब्यूरॉक्रसीमध्ये सुधारणा करण्याची भाषा बोलतात, ती पूर्णत: बदलण्याची नव्हे. मला वाटते - पटेल ते मनमोहनसिंग ही जी विचारधारा आहे, तिने भारतीय नोकरशाहीचे भारतीय प्रशासनासाठीचे महत्त्व ओळखले आहे. मग खरे दुखणे कुठे आहे?
 पण मी दुखण्याआधी त्याचा उपाय सांगतो. कदाचित हा काही वाचकांना उफराटा क्रम वाटेल, पण त्याचेही मी नंतर विवेचन करणार आहे. सरदार पटेलांनी त्या भाषणात खालीलप्रमाणे उद्गार काढले होते.

 'I have seen people who express their opinion about the service

३५४ ■ लक्षदीप