पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडत नाही."
 “मलाही त्याचं एकच ठोस उत्तर कदाचित देता येणार नाही. पण वाढता चंगळवाद आणि व्यापारीकरण हे एक कारण जरूर आहे. तसंच सार्वजनिक मानाच्या क्षेत्रातून आणि मतांच्या राजकारणामुळे झालेल्या पीछेहाटीतून, एक प्रकारची आत्मकेंद्री बनलेली नोकरपेशातील मध्यमवर्गीयांची मानसिकता आणि त्यामुळे पोकळी भरून काढण्यासाठी भोगाची भूल हे दुसरं एक कारण त्यामागे असावं,
 “त्यावर मात करायची असेल तर विवेकाची सुरी धारदार बनवली पाहिजे. जी वाममार्गावर जाताना मला टोचणी देत घायाळ करून शकेल.” चंद्रकांत म्हणाला, हे काम कुणी करावं हा पुन्हा प्रश्नच आहे. अशावेळी एकच हाती उरतं. आपण आपल्यापुरतं विकारी न होता विवेकी राहावं, वागावं...."

 इनसायडरनं चंद्रकांतचा हात स्नेहभरानं घट्ट दाबीत त्याला मूक संमती दिली.

३५२ ■ लक्षदीप