पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ६ ६ ६ ६ ६ तू हवीस - अगदी जवळ... प्रेरणा : गुरू, मी आहे तुझ्यासोबत... गुरू : पण जवळ नाहीस... दुस-या बेडरूममध्ये झोपतेस.. का? का? हेच तुझं | मला सावरणं आहे? मला तू हवी आहेस... मनानं आणि शरीरानं... प्रेरणा : ते - ते अजूनही मला जमत नाही - कारण - कारण तू माझ्या एकट्याचा | आजही नाहीस. गुरू : अगं, मी प्रतिभेला स्पर्शही केला नाही ती दोन वर्षापूर्वी वेगळी झाल्यापासून. ती कॅमेरा ऑफ होताच स्पर्शही करू देत नाही. । प्रेरणा : हा तिचा ग्रेटनेस आहे. मला दिलेलं वचन पाळतेय, पण गुरू - अजूनही तुला ती हवी आहे. बेडरूममध्येही. गुरू : ओ माय गॉड,... (चेहरा हातात लपवीत) शैलेंद्रप्रमाणं तूही सैतान आहेस.. एवढं मनकवडे असू नये माणसानं. मी तोंडानं नाही म्हटलं तरी माझा चेहरा मला दगा देतो. प्रेरणा : मी खरं तेच बोलले ना? गुरू : मी - मी कबूल करतो. प्रेरणा : मी मागे तुला म्हणाले होते - सुरांच्या दुनियेत मी प्रत्येक तान शुद्ध | सच्ची लवते, तिथं मला भेसळ खपत नाही गुरू. गुरू : तुझ्या या कॉम्प्रमाईज न करणाच्या वृत्तीचा अभिमान वाटतो... पण तेवढीच तकलीफही होते... प्रेरणा : मलाही का कमी होते? पण मन घट्ट करत स्वत:ला सावरलं पाहिजे... तू. मनमानी करायला मुखत्यार नाहीस. तुझ्यावर फिल्म इंडस्ट्रीचं कर्ज आहे. ते फिल्म बनवून अदा करणं तुझं परम कर्तव्य आहे आणि त्यासाठी तुला मी पूर्णपणे साथ देतेय. गुरू : (सुस्कारा टाकीत, हताश स्वरात) तेच पुन्हा - तूही माझ्याजवळ आलीस ती कलावंताला माफ करत, पण माणूस म्हणून अजूनही मला तू माफ केलं नाहीस. प्रेरणा : माझ्यातलं स्त्रीत्व फार दुखावलंस तू. इतकं की, माझ्यातलं माणूसपण कितीतरी कमी झालंय.. त्याचं मला दु:ख नाही, कारण त्याचमुळे शुद्ध वेदना बोथट होतात. मी माझ्यातली गायिका मरू दिली नाही कटाक्षानं, लेकिन मेरे अंदर का आदमी जितना जल्दी खत्म हो जाये, उतना अच्छा है मेरे लिए. | गुरू : माझं माणूसपण पण तीव्र निखळ आहे... ते मला मारता येत नाही जीते। जी... त्या माणसाला जरा जवळ कर प्रेरणा... त्याला तुझा स्पर्श हवाय, लक्षदीप । २५९ ६ ६ ६ ६ ६ ६