पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निकटता हवीय... प्रेरणा : जो मुमकिन नही फिलहाल, वो क्यों मांगते हो? मला अजून त्यासाठी | वेळ हवाय. गुरू : तब तक शायद फिल्म खत्म हो जायेगी - फिर न जाने तू अलग हो गयी | तो? प्रेरणा : गुरू... गुरू... काय उत्तर देऊ तुझ्या या प्रश्नाला? प्रेमात मी एकनिष्ठ आहे. आणि तीच अपेक्षा तुझ्यापासून ठेवली होती... पण तुम्हा पुरुषांना एकीचं होऊन जीवनभर राहाता येत नाही. मीही असंच वागले असते तर तू काय केलं असतंस गुरू? (प्रेरणा बारपाशी जाते. पेग तयार करून पीत राहाते. गुरू आणि प्रेरणा फक्त एकमेकांकडे बघत राहातात. अंधार) (पुन्हा जेव्हा रंगमंच प्रकाशतो, तेव्हा अब्बास व गुरू दिसतात.) गुरू : नाही यार... कुछ नहीं जम रहा है... मला वाटत नाही, मी हा पिक्चर पूर्ण करू शकेन. अब्बास : गुरू... बडे अजीब किस्म का आदमी है तू... एवढी चांगली पटकथा आपण तयार केली आहे. पुन्हा उत्तम गाणी, उत्तम संगीत आहे. अप्रतिम ड्रीम स्टारकास्ट आहे. कमी आहे ती फक्त तुझा सूर गवसण्याची... गुरू : तोच तर तारा तुटल्याप्रमाणे बद्ध झाला आहे. पिक्चरचं सारं काही यथायोग्य | आहे.. माझ्या जागी तूही हा सिनेमा दिग्दर्शित करशील तर ग्रेट होशील. अब्बास : पण तुझा परीसस्पर्श हवा त्यासाठी. गुरू : (विषण्ण हसत) लोखंडाला कशाला परीस म्हणतोस अब्बास... यातलं परीसत्व हरवलंय रे. अब्बास : गुरू... यापूर्वीही याहीपेक्षा जास्त टेन्स आणि डिप्रेस्ड असताना तू सगळं विसरून स्वत:ला चित्रपट निर्मितीमध्ये झोकून देत होतास... वेळी काय झालंय तुला? प्रेरणा आणि प्रतिभा किती समजुतीनं वागत आहेत. तुला सांभाळत आहेत... गुरू : दोघींना मानलं पाहिजे. यार... खरंच त्या दोघी किती ग्रेट आहेत... स्वत:ची परवड सहन करायची, स्त्री म्हणून होणारा अपमान गिळायचा... एवढा मी त्यांच्या प्रेमाला लायक नाहीय रे...। अब्बास : असं स्वत:ला कमी समजायचं काही कारण नाही... तू आम्हा सर्वांपेक्षा मोठा जीनिअस कलावंत आहेस. आम्हा तिघांनाही तू तेवढाच हवा आहेस हे कधीही विसरू नकोस.. . त्याचीच तर भीती वाटते.. दडपण असेल तर याचं आहे की, तुम्ही मला २६० । लक्षदीप