पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रेरणा : (कडवट हसत) मनातला दर्द गाण्यात उतरला एवढंच... शैलेंद्र वेचक शब्दात मनाच्या आरपार घुसतो... (गुणगुणते, शेर पेश करण्याचा अंदाज) पास है पर तू साथ नहीं। मैफील का दौर है, पर वो बात नहीं। उदासी का आलम और चाँद की रात नहीं। मौत आती नहीं और जिंदगी के जजबात नहीं। कैसे कोई जीये जब तेरी हाथ में हाथ नहीं। कैसे गुजारे लंबे दिन, रात कटती नहीं। चुप्पी नहीं पर मुकम्मलसी बात नहीं। विरह की उमरकैद और थोड़ी भी राहत नहीं। गुरू : खरंच सैतान आहे हा शायर... हे हाले दिल उसने मुझे देखकर गीत में बांधा, लेकिन दर्द तेरी आवाजसे निकला... ऐकताना प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतं... प्रेरणा : हा गुरू,... हा दर्द, ओल्या जखमाच तर कलेची बीजं असतात... ह्या जखमा प्रेक्षकांना कलात्मक आनंद देतात, पण त्या सादर करणाच्या कलावंताला दु:खाच्या सागरात डुंबावं लागतं. गुरू : बड़ी पते की बात कही तु ने प्रेरणा. प्रेरणा : (नि:श्वास सोडून) आता थोडे स्विच ऑफ होऊ या - गुरू : कसं शक्य आहे? मला नाही जमत असं ऑन - ऑफ होणं. प्रेरणा : (हसून) ते अस्सल कलावंताचं लक्षण आहे गुरू. और तू तो गजबको आर्टिस्ट है... तुझे ये बात मैं बताऊँ? ताज्जुब हैं... (जोरजोरात हसत राहाते) गुरू : मला कळतं गं, पण अलीकडे या दोन वर्षात मी फार गोंधळतोय. माझी संभ्रमित अवस्था संपत नाही. प्रेरणा : कलाकारानं माणूसपण आणि कलावंतपणाची गल्लत करता कामा नये. ती चूक तू हल्ली करतोयस. जेथे माणसासारखं वागायला हवं, तिथं कलावंत जागवत मेलोड्रामॅटिक रिअॅक्शन देतोस आणि कलावंत म्हणून अभिनय करताना माणसासारखं स्वैर भावनिक होतोस - कलावंताला भावना प्रकट करतानाही अंतर्यामी तटस्थता बाळगावी लागते हे विसरू नकोस. तुझी कात्रीत सापडलेल्या सुपारीसारखी अवस्था झालीय, त्या कात्रीची दोन पाती म्हणजे तुझं कलावंत आणि माणूसपण... त्यात तू कातरून निघतोयस, गुरू सावर स्वत:ला, नाही तर संपून जाशील... गुरू : (भावनावश होत) होय प्रेरणा, मला सावरायलाच हवं - पण त्यासाठी २५८ । लक्षदीप