पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अब तरी... आणि तुला जगलेलं आणि खूप मोठं झालेलं पाहीन मी. (हुंदके देत निघून जाते) अंक पहिला समाप्त अंक दुसरा अब्बास : आईये... भाभी... आईये... आपही का घर है... प्रेरणा : भाईजान... माझ्याच घरी येते आहे मी अजनबी प्रमाणे... (कडवट हसू) शुक्रिया भाईसाब... शुक्रिया... अब्बास : शुक्रिया किसलिये? प्रेरणा, या घराचा मीही एक हिस्सा आहे... मी केलं ते या घरासाठी... प्रेरणा : (कृतज्ञ स्वर) सचमुच आज आप सिर्फ भाईजान नही... एक फरिश्ता बनके आये और मुझे फिर से मेरे घर ले आये... अब्बास : किती वेळा असं भांडण झालं की घर सोडायचं प्रेरणा? प्रत्येक वेळी मग मी तुझ्या भावाकडे यायचं... तुझी समजूत घालायची आणि परत आणायचे. मला काही दुसरा उद्योग नाही? प्रेरणा : आपको भाईजान जो कहती हूं... तो छोटी बहन के लिए इतका तो करना ही पडेगा. अब्बास : पण बहिणीनंसुद्धा ऐकावं मोठ्या भावाचं. तुला किती वेळा सांगितलं की गुरू सामान्य माणसांसारखा नाही... त्याच्या वागण्याला व्यावहारिक फूटपट्या लावून तू चूक करतेस. त्याला आणि स्वत:ला त्रास देतेस... प्रेरणा : कळतं.. सगळं कळतं भाईजान... पण काय करू? माझे संस्कार मला असं करायला भाग पाडतात. मी नाहीं सहन करू शकत माझा गुरू मला सोडून दुस-या स्त्रीमध्ये गुंतलेला.. अब्बास : पण गुरूची आणि प्रतिभेची रिलेशनशिप केवळ स्त्री-पुरुषाचीच नाही.. त्याहीपेक्षा तो निर्माता आणि ती त्याची आवडती कलाकृती अशी आहे. दोन अस्सल ताकतीच्या कलावंताची परस्परांना प्रेरणादायी ठरेल अशी ती संगत आहे. प्रेरणा : भाईजान... तुम्ही विसरलात... मीही एक कलावंत आहे.. स्वत:चं स्थान असलेली इंडस्ट्रीतली एक आघाडीची गायिका आहे. अब्बास : गुरू नेहमी तुझ्याबद्दलसुद्धा म्हणत असतो... प्रेरणा माझा स्वर आहे... | माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे... प्रेरणा ; आणि शहनाज माझी निर्मिती आहे... प्रतिभा आहे... असंच ना? (उसळत हा शुद्ध अप्पलपोटेपणा झाला. तुम्ही पुरुष आपल्या फूटपट्टीनं त्याच २५२॥ लक्षदीप