पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समर्थन करता. अब्बास : कदाचित हे खरंही असेल प्रेरणा... पण हे तुला कबूल केलंच पाहिजे की, आपणा सर्वांपेक्षा गुरू मोठा कलावंत आहे. तो आपल्याशी कसा वागतो हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते त्याचं फिल्म मेंकिग, आपणच त्याला जपलं पाहिजे... सांभाळलं पाहिजे. कारण माणूस म्हणून तो फार दुबळा आहे. छोट्या मुलाप्रमाणे क्षणिक लहरीवर, अंत:प्रेरणांवर जगणारा आहे. प्रेरणा : भाईजान, तुम्ही गुरूचे दोस्त आहात. दोस्ती ही भावना निखळ एकेरी असते... त्यात गुंतागुंत नसते, म्हणून तुम्ही असे बोलू शकता. पण मी पत्नी आहे त्याची.. कोट्यधीशाची मुलगी मी. त्याच्या प्रेमात पडून मी घर सोडलं त्यावेळी गुरू कोण होता? एक धडपडणारा होतकरू नट, मी मागचा पुढचा विचार न करता त्याच्या सोबत दहा बाय दहाच्या खोलीत संसार थाटला. तेव्हाचा त्याला स्ट्रगल... त्याची उमेदवारी, तेव्हाचं त्याचं फ्रस्ट्रेशन मी माझं म्हणून सोसलं.. भोगलं... त्याला... त्याच्यातल्या हळव्या कलावंताला उभारी दिली. त्याच्यावर माझा त्या काळच्या सहजीवनापोटी तरी अधिकार नाही? अब्बास : हां प्रेरणा. पण गुरूला कुठे इन्कार आहे?... त्याला तू आजही तेवढीच | हवी आहेस प्रेरणा : पण प्रतिभाला शेअर करतच ना? भाईजान... मला तेच सहन होत नाही... तडफड होते जिवाची... अब्बास : मी गुरूची बाजू घेतोय असं समजू नकोस... पण ही फिल्मी दुनिया मेक बिलिव्हची दुनिया आहे. इथं हिरो, हिरोईन यांना कॅरेक्टर जगावे लागतात, ते जगता जगता त्यांच्यात जवळीक निर्माण होणं नॅचरल आहे. प्रेरणा : माझा प्रतिभावर राग नाही. माझी तक्रार आहे गुरूबद्दल. स्त्रीनं पतीला सात जन्मासाठी आपलं मानायचं अशी प्रथा आहे आपल्या समाजात, मग स्त्रियांनीसुद्धा हीच अपेक्षा का करू नये पुरुषांकडून? अब्बास : शेवटी मीही पुरुषच ना. प्रेरणा : तुम्ही सफाईनं उत्तर द्यायचं टाळता आहात भाईजान... अब्बास : नाही प्रेरणा... मला उत्तर टाळायचं नाही... पण ते पुरतं माहीत नाही हे। कारण आहे. (विचार करीत) स्त्रियांसारखी समर्पणशीलता पुरुषांमध्ये कमीच असते. कदाचित हजारो वर्षांपासून पुरुष घराबाहेर वावरत आला आहे म्हणून असेल किंवा स्त्रीला घरातच कुटुंब-व्यवस्थेच्या आदर्शाखाली बांधलं गेलं म्हणूनही असेल, पण स्त्री एकाच पुरुषाची होऊन राहते. लक्षदीप । २५३