पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(प्रकाशझोत बंद. ती नाहीशी होते.) (प्रतिभेला) तुला तरी हे समजतं का? (प्रकाशझोत बंद. प्रतिभा पण नाहीशी होते.) (तो थकून कोचावर बसकण मारतो. अंधार) । (पुन्हा प्रकाश येतो तेव्हा गुरू बसलेला. समोर प्रतिभा.) प्रतिभा : आज फैसले की घडी है गुरू । गुरू : (त्रस्तपणे) मैं कुछ फैसला नहीं कर सकता... प्रतिभा : नाही गुरू, आता ती वेळ आलीय, कालच मला याचा सोक्षमोक्ष लावायचा होता. फक्त अब्बास भाईजाननी आग्रह केला म्हणून थांबले. गुरू : तसंच काही नाहीय प्रतिभा - गिव मी सम मोअर टाईम... प्रतिभा : तू कधीच फैसला करू शकणार नाहीस गुरू. तू माझ्याशी... माझ्या समाधानासाठी म्हणून का होईना लग्न करू शकणार नाहीस. कारण तुझ्या अंतरात्म्यात पूरी तरहसे प्रेरणा बसी है; उसके कारण तू फैसला नहीं ले सकता. मी स्पष्टच सांगते गुरू. मला तुझी पत्नी होता येत नसेल तर मी तुझ्यापासून वेगळी होतेय... होय, माझ्या मनाचा आजपर्यंत निश्चय होत नव्हता... माझ्यामुळे तुझी प्रतिभा काळवंडतेय ना?... मग मी दुर होते गुरू. गुरू : किती सहजपणे किती कठोर बोलून गेलीस, प्रतिभा? अगं, असं नुसतं | म्हटल्यानं वेगळ होता येतं? मनानं... आत्म्यानं होता येतं? आज माझी प्रतिभा नात्याच्या गुंत्यानं आणि बंधनानं काळवंडलीय. पण तू दूर गेलीस तर ती पुरती संपून जाईल... प्रतिभा : तुला स्वत:ला सावरावं लागेल गुरू... कारण माणसापेक्षाही तू मोठा कलावंत आहेस... आणि तुझं खरं कार्य मला किंवा प्रेरणेला सुख देण्यापेक्षाही चित्रपट निर्माण करणे हे आहे... असायला हवं... तुझं माझ्यावाचून काही अडणार नाही... मी गेले तरी तुझी प्रतिभा तुझ्याजवळ आहे. तू नव्या प्रतिभा घडवू शकतोस गुरू... गुरू : नाही... मला ते जमणार नाही.. तू केवळ फक्त एक अभिनेत्रीच नाहीस. माझ्या जीवनाचा... कलाजीवनाचा प्रभावी हिस्सा आहेस. तू दूर झालीस तर कदाचित मी जगेनही. पण कलावंत... दिग्दर्शक म्हणून संपून जाईन... प्रतिभा : तू वेडेपणा करतो आहेस... तुझं माझ्यावरचं उत्कट प्रेम बोलतंय... पण तू प्रतिभेविनाही मोठा कलावंत होतास, आहेस आणि असशील. मी तुझ्यापेक्षा जास्त सोशिक आहे. स्त्री आहे ना... मलाही तुझ्यापासून वेगळं होऊन जगणं सुखाचं नाही... सोपं तर मुळीच नाही. पण जगेन कशी लक्षदीप ॥ २५१