पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीमध्ये आहेत. काश्मीरियत संकल्पनेचा काहीसा ललित अंगाने वेध घेतला आहे. यासाठी नामवंत संस्कृती अभ्यासकांची मतेही नोंदविली आहेत.
 या संग्रहात देशमुख यांनी शासकीय कर्मचारी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षणीय भाषण दिले आहे. मध्यमवर्गीय मराठी साहित्याच्या मर्यादा सांगून प्रशासकीय कर्मचा-याच्या लेखनाचे वेगळेपण सांगितले आहे. मराठीतील प्रशासकीय अनुभवाधारित लेखनपरंपरा सांगून स्वत:च्या निर्मितीचा धांडोळा घेतला आहे. तसेच वाचनसंस्कृतीबद्दलचा विचार मांडला आहे.

१०.

 प्रशासनविषयक लेखन हा देशमुख यांच्या एकूण लेखनाचा एक महत्त्वाचा आविष्कार आहे. ललित साहित्यातून तर त्यांनी याप्रकारचे चित्रणक्षेत्र मोठ्या प्रमाणात आणले.शिवाय इतरही प्रशासनविषयक वैचारिक स्वरूपाचेही लेखन त्यांनी केले आहे.याविषयावरची त्यांची ‘प्रशासननामा' व 'बखर प्रशासनाची' ही दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.२००० साली दै. लोकमतमधून त्यांनी रविवार आवृत्तीसाठी ‘इनसायडर' नावाने एक सदर लिहिले होते.तो पुढे ‘प्रशासननामा' या नावाने प्रकाशित झाला. निबंध व कथा असा संमिश्र प्रकार असणा-या लेखनातून देशमुखांनी प्रशासनातले विविध अनुभव सांगितले आहेत.चांगला लेखक प्रशासनातले अनुभवप्रदेश किती वारकाईने मांडू शकतो ते वैशिष्ट्य या लेखनात आढळते.जिल्हाप्रशासन हा या लेखनाचा केंद्रवर्ती विषय आहे.गावपातळी ते जिल्हा पातळीवरील प्रशासनाचे संदर्भक्षेत्र या लेखनात आहे.वास्तवदृश्य हे लेखन असल्यामुळे राजकारणातील, प्रशासनातील अनोळखी चेहरा वाचकांबरोबर आणण्यासाठी चंद्रकांत या कल्पित पात्राची निर्मिती केली आहे.चंद्रकांत हा संवेदनशील अधिकारी आहे.त्याच्या नजरेतून प्रशासनाचे जग न्याहाळले आहे.हे लेखकाचे मानसपात्र आहे.तत्त्वनिष्ठ,प्रामाणिक समाजशील तो इनसायडरशी सतत संवाद साधतो.लेखकाने यात प्रशासकांना पगारी समाजसेवक (Paid Social Worker) म्हटले आहे. कल्याणकारी राज्यासाठी प्रशासक सकारात्मक दृष्टिकोनातून कसे काम करू शकतो याचे एक चित्र या लेखनात आहे.भारतीय प्रशासनाची ब्लू प्रिंट या लेखनात आहे.राज्यकर्ते व प्रशासन यातील गुंतागुंतीचे ताण या लेखनातं आहेत,भ्रष्टता आहे,प्रशासनातील विविध गुंत्यांचे खोलवरचे दर्शन तीमध्ये आहे.

 तसेच चांगले अधिकारी राज्यसंस्था व जनता यातील दुवे कसे होऊ शकतात,चांगले निर्णय घेऊन समाजशील कामे कसे करू शकतात याचे कथन आहे.संवेदनशील प्रसंगी जनमानस व समुहमानसशास्त्र माहीत असल्यामुळे निर्णय घेण्यातील तत्परता ते कसे दाखवतात,तसेच भारतीय जनमानसाचा प्रशासनाकडे बघण्याचा

लक्षदीप ॥ २३