पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मला भावोजींचा घोर लागून राहिलाय. पहा, कसे विचित्र बोलत होते. ती पण कापच्या आवाजात म्हणाली.
 ती सारी संध्याकाळ आम्ही घरी दोघांनी नि:शब्द काढली. मला पुन्हा पुन्हा देगावकरांचे या प्रश्नाच्या संदर्भातले विवेचन आठवत होते. ते म्हणत होते, त्याचा आज मला अमितच्या संदर्भात किती गडद पद्धतीने प्रत्यय आला होता. खरंच, आपल्या समाजाला मुली का नको आहेत? मीही त्यातलाच एक आहे की. मीही पहिला मुलगाच हवा म्हणून बायकोला स्त्रीभ्रूण म्हणून पाडायला लावलं होतंच की! यामुळे मागील वीस वर्षात मुलींची संख्या झपाट्याने कमी झाली, त्यामुळे आज लग्नाच्या बाजारात मुलींचा तुटवडा आहे. अगदी चांगल्या देखण्या व भरपूर पगाराच्या मुलांनाही अनुरूप मुली मिळणं कठीण होत चाललंय. त्यांनाही तडजोड करीत कमी प्रतीच्या, विजोड मुलींना स्वीकारावं लागतंय.
 अमितसारख्या साध्या, सुमार व कमी पगार-शिक्षण असलेल्या मुलांची लग्नं जुळणं किती कठीण होत चाललंय. आज सहा नकार त्यानं व आम्ही पचवले की... त्याच्या शारीरिक भुकांचं काय?
 अंगावर पाल पडताच जसं किसळून यावं, तसं माझं मन शहारलं. किती तरी वेळ तो विचार मनातून जाईना. घड्याळाचा काटा चढत होता, पण अमितचा पत्ता नव्हता. त्यानं बहुतेक मोबाईल पण स्विच ऑफ करून ठेवला असावा.
 मध्यरात्री दारावरची बेल कर्कश्श आवाज करीत वाजली. नुकताच कुठे माझा डोळा लागत होता. तो कॉलबेलचा दीर्घ आवाज कसली तरी भयसूचक घंटा वाजवीत मला खाडकन जागं करून गेला.
 मी दार उघडलं आणि कसाबसा स्वत:ला सावरीत पूर्ण शुद्ध हरवलेला अमित आत आला व आपल्या कॉटवर स्वत:ला त्यानं एखादी नकोशी वस्तू फेकावी तसे फेकून दिलं!
 तो स्वत:शीच नशेमध्ये अस्फुट पुटपुटत होता, त्यातले काही शब्द कानी पडले व संध्याकाळपासून वाटणारी भीती खरी ठरली होती, "ख-ख-खूप मजा आली... साली-काय गच्च होती!”
 काही दिवसातच त्याला एका एडसूचा उपचार करणा-या ‘आधार’ संस्थेत । दाखल करावं लागलं. कारण - अनप्रोटेक्टेड सेक्स. तो त्या दिवसापासून जिच्याकडे रोज रात्री जाऊ लागला होता, तिचा हा प्रसाद होता!

 त्याला घरी ठेवणं तो पुत्रवत असनही मला अशक्य झालं होतं. कारण एके रात्री सागितलं होतं, “भावोजींची नजर बदललीय - मला भीती वाटते. काल त्यांनी माझा-माझा हात धरायचा प्रयत्न केला होता!”

लक्षदीप । २२९