पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यातून मी 'रेशीमगाठी' हे मॅरेज ब्युरो - वधूवर सूचक मंडळ स्थापन केलं. त्याचा पसारा वाढत गेला तशी मी नोकरी सोडली. आता त्यालाही दोन दशकं होऊन गेली. व्यवसाय म्हणून समाधान असलं तरी एक नवाच प्रश्न मला हल्ली जाणवायला लागलाय. आणि तोही मीच घेतलेल्या पुढाकारातून ठसठशीतपणे अधोरेखित झालेला.
 आणि जिल्हाधिकारी असलेल्या मित्राचा अचानक फोन आला. त्याला निमित्त झालं ते फेसबुकवर मी काही महिन्यापूर्वी 'रेशीमगाठी' या नावानं अकौंट उघडलं, ते जास्तीत जास्त वधूची स्थळ नोंदणीसाठी यावीत म्हणून. कारण दरवर्षीच्या माझ्या भव्य प्रमाणात होणा-या वार्षिक वधूवर सूचक मेळाव्यात लग्न जुळण्याचं प्रमाण हल्ली कमी कमी होत होतं. कारण मुलांची स्थळ मोठ्या प्रमाणात नोंदली जायची, पण त्याच्या तुलनेत किती तरी कमी प्रमाणात हल्ली नवीन मुलींची स्थळ नोंदली जात होती. त्यामुळे फेसबुकवर मी रेशीमगाठी' नेली, पण तेथेही आश्वासक प्रतिसाद नव्हता. पण सुरुवात झाली होती. माझ्या मित्रानं फेसबुकवर रेशीमगाठी' पाहिली आणि मला परवा रात्री त्याचा फोन आला.
 "यार उत्तम, मी येत्या पाच एप्रिलला येतोय तुझ्या शहरात. मला एक पुरस्कार मिळतोय. ते निमित्त समज, पण मला तुझ्या या वर्षीचा रेशीमगाठीचा वार्षिक वधूवर सूचक मेळावा अटेंड करायचा आहे."
 “कशासाठी? तुझं कुणी नात्यातलं स्थळ आहे का?' मी नेहमीप्रमाणे इतरांना विचारतो तशी विचारणा केली.
 “ओ, नो! मी एक केस स्टडी करतोय, त्यासाठी मला एका मॅरेज ब्युरोची मदत लागणार आहे. तो म्हणाला, “तुझं हे ब्युरो १९८५ साली स्थापन झालं - राईट? म्हणजे जवळपास तीन दशकं तू हे काम करीत आहेस. तुझी स्वत:ची रेशीमगाठीची वेबसाईट आहे, ती मी ओपन करून पाहिली आहे. आणि गेल्या महिन्यात दोन तीन वेळा फेसबुकवर मी रेशीमगाठी फॉलो केलीय. मला माझ्या केस स्टडीसाठी तूच सर्वात उपयोगी ठरशील!"
 “मला आनंद आहे की, मी तुला तुझ्या कामात थोडा तरी उपयोगी ठरलो तर. मी उत्तेजित होत म्हणालो, “कांता, किती दिवसांनी भेट होणार आहे आपला ? माघार्धात आपली कॉलेज जीवनातली चार वर्षे व असंख्य स्मृती मनात तरंगून गेल्या वछ त जरूर ये. माझ्या घरीच राहा. पूर्वीप्रमाणे चहा-सिग्रेटीवर गप्पा मारीत रात्र रात्र जागवू."

 “येस येस, किती तरी वर्षात असं रात्रभर गप्पा मारण्याचा योग आला नाही. तोही उचंबळन आला होता. मला मोबाईलमधून येणा-या आवाजात त्याची उत्तेजना व मित्र भेटीचा आनंद जाणवत होता. मी माझ्या प्रशासकीय कामात एवढा रममाण

२२० । लक्षदीप