पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६. केस स्टडीज़ उपोद्घात परवा रात्रीच्या वेळी त्याचा अचानक फोन आला तेव्हा मी चकित झालो. एकेकाळी कॉलेज जीवनात आम्ही हॉस्टेलला चार वर्षे रूम पार्टनर असल्यामुळे आमची घट्ट मैत्री होती. पण नंतर आमची करिअर भिन्न झाल्यामुळे संपर्क राहिला नाही. मी व्हेटरनरी डॉक्टर म्हणून प्रथम शासकीय नोकरी काही वर्षे केली व मग गेल्या दोन दशकापासून वधूवर सूचक मंडळाचं पूर्ण वेळ काम व्यवसाय व सामाजिक जाणिवेने करतोय, तो प्रथम उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत लागला. तेव्हा मी त्याच्या गावी । जंगी सत्कारही घडवून आणला होता. मग तो नोकरीच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्र हिंडत राहिला. तो पब्लिक फिगर असल्यामुळे व प्रत्येक पदावर वेगळं, चाकोरीबाहेरच्या कामामुळे मी त्याच्या बातम्या नेहमीच वाचायचो. पण कधी त्याला फोन केला नाही की संपर्क साधला नाही. पण मित्र म्हणून त्याचा नेहमीच अभिमान वाटायचा. आज तो एका जिल्ह्याचा कलेक्टर आहे. तेथे तो सतत काही तरी नवं नवं करतोय हे टी. व्ही. वर पाहात, ऐकत व पेपरात वाचत होतो. पण का कोण जाणे, त्याच्याशी अलीकडेही संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही. माझं 'रेशीमगाठी' हे वधूवर सूचक मंडळ मी नोकरीत असताना पत्नीच्या नावाने सुरू केलं होतं ते एका सामाजिक जाणिवेनं. पूर्वीच्या काळी प्रत्येक जात - जमात व समाज हा एकमेकाला धरून पंचक्रोशीत राहायचा व संपर्कातून विवाह - अरेंज मॅरेजेस सहजतेनं व्हायचे. पण शिक्षणाचा प्रसार, देश व जगभर नोकरीसाठी भटकणं, चौकोनी कुटुंबामुळे आप्त कुटुंबीयांशी कमी झालेले संबंध आणि शूजनही भारतात पाच-दहा टक्क्यापेक्षा जास्त न होणारे प्रेमविवाह त्यामुळे मुलांची लग्नं जुळवण्यासाठी आईबापांना करावी लागणारी धावपळ हे आजचं एक सामाजिक वास्तव आहे. मी स्वत: आवर्जून नातेवाईक व मित्र परिवारातील लग्न चुकवत नाही. 'शादी किसीकी हो, अपना दिल तो गाता है' अशा भावनेनं 'दिवाना अब्दुल्ला'प्रमाणे अस्मादिक लग्न समारंभात जायचे. त्यावेळी होणाच्या गप्पागोष्टीतून हे वास्तव अधोरेखित झालं. आणि लक्षदीप । २१९