पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो की नोकरीची तीस वर्षे कशी गेली कळलंच नाही. आजही आपलं कॉलेज लाईफ जणू काल-परवाची गोष्ट वाटतेय."
 “कांता, यू आर मोस्ट वेलकम," मी त्याला पुन्हा आग्रहाचे निमंत्रण देत म्हणालो, “तू नक्की ये. पण कोणती केस स्टडी तुला करायची आहे? आणि त्याचा काय संबंध आहे माझ्या रेशीमगाठीशी, हे जरा कळू दे."
 "मला ही केस स्टडी ज्या उद्देशानं तू रेशीमगाठीला फेसबुकवर आणलंस, त्यानं तर सुचलीय!' तो म्हणाला. आणि नंतरचा अर्धा तास तो त्याच्या विषयाच्या संदर्भात बोलत राहिला व तो येण्यापूर्वी मी काय करावं हे सांगून म्हणाला, “जर शक्य असेल तर हे तू लिहून काढ. आणि २०१२ चा मेळावा तर मी प्रत्यक्षच ऑब्झर्व्ह करणार आहे."
 "खरं सांगू कांता, हा विषय मला अनुभवाच्या आधारे जाणवत होताच, पण त्यातलं धगधगतं वास्तव तुझ्या बोलण्यावरून अधोरेखित होतंय." मी विचारमग्न होत म्हणालो, “मी जरूर प्रयत्न करीन. आणि दोन प्रसंग माझ्या साध्या-सरळ घरगुती भाषेत लिहून काढीन."
 “बॅक्स मित्रा, मी येतोय तेव्हा बाकीचं बोलू!" आणि कांतानं फोन बंद केला.
 आता माझी झोप उडाली होती. मी लॅपटॉप उघडला. प्रथम रेशीमगाठी फेसबुकवर गेलो. मागच्या आठवड्यात जगभरातून जी नोंदणी झाली होती त्यामध्ये मुलाचं प्रमाण चांगलं होतं, पण मुलीचं तुलनेत कमी होतं. मग मी माझी वेबसाईट उघडली. त्यात मागील दहा वर्षांची सर्व स्थळांची व जुळलेल्या लग्नांची नोंद होती. जवळपास दोन तास मी लॅपटॉप उघडून होतो आणि मनात मागील पंचवीस वर्षांच्या आठवणी जाग्या होत होत्या.
 आणि कांतानं ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे त्याच्या केस स्टडीसाठी दोन वार्षिक प्रसंग झपाट्यानं लिहायला सुरुवात केली. की-बोर्डावर वेगानं बोट फिरत होती, त्याहीपेक्षा अधिक वेगानं मन:पटलावर विचार येत होते. दोन्हीची गती जुळवून चत लेपटॉपवर टंकबद्ध करताना तारांबळ होत होती. पण सत्य मनाला हादरे देत होतं. मला नुकताच नातू झाला होता. तो जेव्हा लग्नाच्या वयाचा होईल तेव्हा काय? हा प्रश्न मनात उमटला आणि माझी की-बोर्डवर फिरणारी बोटं थांबली. खोलवर कुठेतरी एक कळ उमटली.

 कांता आज जे काम करीत आहे व केस स्टडीसाठी अभ्यास व संशोधन करीत आहे ते सामाजिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे हे प्रकर्षाने जाणवलं. त्याच्या-माझ्या नातवंडासाठी. सुदैवानं आमच्या मुलांची लग्न झाली आहेत, या विषम जैविक असमानतेच्या काळातही. म्हणून ती सुटली! त्याचं काम किती महत्त्वाचं आहे. लाला मला मदत केली पाहिजे. मी भरकटलेल्या मनाला सावरीत पुन्हा की

लक्षदीप ॥ २२१