पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतात नेऊन पुरायचा आहे व त्यावर एक मोग-याचं झाड लावायचं आहे."
 काय हा भलताच विचार. त्याला काही अर्थ?
 "आहेच मुळी! एक एक फुलणारी टपोरी मोग-याची कळी मला माझ्या मारलेल्या मुलीची सुगंधी आठवण देईल. तेवढंच मन हलकं होईल!”
 वा, काय तर्क! काय कल्पनाशक्तीचा फुलोरा. तुमची बायको कविता करते की काय? का अलका कुबल - आशा काळेचे रडके मराठी सिनेमे पाहाते? नाही तर असं काही सुचलं नसतं!
 माहीतंय महाशय की, तुम्हाला त्या गंभीर वातावरणात (हो, तुमच्या बायकोनं डून डोक्यावर घेतल्यामुळे) हसं आवरताना कठीण जातंय - तिचं हे खुळचट भयंकर विनोदी बोलणं ऐकून. पण बाजूला नर्स आहे व अनेकांची जनरल वॉर्डमध्ये सतत ये जा आहे, म्हणून तुम्ही शांत आहात!
 "ठीक आहे. मी डॉक्टरांना आले की विचारतो!”
 "त्याशिवाय मी नाही हे घरी येणार."
 "पुरे. फार झालं. चूप आता!"
 मागील दोन वेळा तिच्या तर नाहीच, पण तुमच्याही मनात पाडलेल्या गर्भाचं - भ्रूणाचं दर्शन घ्यायचं जरा पण आलं नव्हतं!
 तुम्ही तसे धश्चोट व कठोर काळजाचे आहात. हे तुमची बायको अनेकदा म्हटल्याचं ऐकलंय म्हटलं आम्ही. पण तरीही तुमची ते पाहायची हिंमत झाली नव्हती - खरं ना?
 अहो, तुमच्या पुरुषी वीर्याचा तो आविष्कार ना! तुमचं पुरुषत्व त्यानं पुन्हा पुन्हा सिद्ध होतं ना! त्या - त्या टोमण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता ते ठीकच आहे. तुमच्यात पर पैदा करायचे गुण नाहीत - केवळ पोरीच पैदा होण्याचे क्रोमासोम्स आहेत! ते खरंच तुम्ही मनावर घेऊ नका. जन्मणाच्या बाळाचं लिंग हा गुणसूत्रांच्या खेळाची परिणती आहे हे त्यांना कळत नाही. पण ते आपल्याला थोडंच कळतं? ते टोमणे मारणारे अज्ञानी आहेत, असं मानून तुमचे दुर्लक्ष करणं योग्यच आहे. तुम्ही मात्र कसे विज्ञाननिष्ठ! म्हणून तर लागणा-या डोहाळ्यावरून मुलगा का मुलगी यावर विश्वास न ठेवता, विज्ञानाची कास धरत सोनोग्राफी टेस्ट करता. शंकेला वाव नको म्हणून ‘सेकंड ओपिनियन' घेता. या वेळी तर डॉक्टर महाशयांशी तिसरी वेळ असल्यामुळे झालेल्या मैत्रीचा हवाला देत तम्ही स्वत: मॉनिटरवर लिंग पाहून खात्री करून घेतला. नुन्नीच्या ऐवजी छिद्र पाहून तुमच्या मनालाही शतशः छिद्रं पडली होती. हा भाग वेगळा. पण तुम्ही खरंच विज्ञानवादी.

 त्यामुळेच तुम्हाला माहीत आहे की, पोटात असला तरी गर्भात प्राण भरलेला आहे. लहानपणी शाळेत पानामध्ये, वनस्पतीमध्ये जीव असतो याचा शोध लावणाच्या

लक्षदीप । २०९