पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जयदेव जयदेव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।

 पूजेनंतर मोरया गोसावी जपासाठी गाभा-यातच ध्यान लावून बसला आणि भारावलेली अवस्था संपल्यावर भानावर येत अक्षय उठून बाहेर आला.
 पाऊस थांबला होता आणि सूर्याचा लख्ख प्रकाश आसमंतात फाकला होता. पण त्यानं प्रसन्नता - नवचैतन्य आणलेलं नव्हतं, तर त्या प्रकाशात काल रात्रीच्या विध्वंसाचे विदारक रूप दिसत होतं! अजूनही आपली सीमारेषा - आपलं पात्र - ओलांडून गावातील सखल भागात शिरलेली पूर्णा नदी उन्मत्त आवेगानं आपलं लाल जळ धडकी भरवरणाच्या वेगानं नेत वाहत होती... काळी चिकण माती लाभलेली तामुलवाडी चिखलानं लथपथली होती. ठिकठिकाणी दबा धरून बसलेले बेडूक किळसवाण्या भीतियुक्त आवाजात ओरडत होते... गुरुडानं आकाशातून झेप घेत एक मलला सर्प उचलून नेताना अक्षयनं पाहिलं आणि तो शहारला!
 तामुलवाडीला जाग आली होती आणि नेहमी प्रातर्विधीस वाळूच्या वनात जाणारे ग्रामस्थ तेथून पाणी वाहत असल्यामुळे अलीकडेच विधीला बसले होते... ते दृश्य हुन अक्षयला मुंबईत असताना लोकलमधून पहाटे जाताना दोन्ही बाजूंच्या दृश्यमालिका आठवल्या.... आणि त्यानं खांदे उडवले!
 वाड्यावरून पाटलाचा गडी सांगावा घेऊन आला होता. चहाला त्यांनी बोलावलं हात व तिथं आमदार व तहसीलदार अक्षयची वाट पाहात होते. रात्री त्यानं वाड्याच्या सुक्षत उबेत राहायचं नाकारून मंदिरात राहायचं पसंत केलं होतं आणि वाड्यावरचं कावडीचं मसालेदार जेवण टाळून तो मास्तरच्या घरी पिठलंभाकरी जेवला होता. त्याचं हे विचित्र वागणं त्यांना समजत नव्हतं.
 अक्षयला तरी कुठे आपल्या विचित्र वर्तनाची संगती लागत होती? तो क्षुब्ध , पण आपला क्षोभ कुणावर होता हेच त्याला कळत नव्हतं!
 काल दुपारी तहसीलला आमदारांनी समन्वय समितीची बैठक बोलावली होती. क्षय रुजू झाल्यानंतर ही पहिलीच बैठक, पहिल्या पंधरवाड्यातच लागलेली. तेथे नुवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झालेलावाडीचे सरपंच व चार ग्रामस्थ अव आले होते व त्यांनी रोखठोकपणे सवाल टाकला होता.
 "किती वरीस आम्ही दर बरसातीला भीत-भीत जगायचं, आमदार साहेब? ही बाजूनी ओढे आहेत व चवथ्या दिशेला पूर्णा नदी, गाव तसं उंचावर आहे. पण इन पाऊस पडला की नदीचं पात्र वाढतं, बॅकवॉटर ओढ्यात शिरतं आणि पूर्ण वाडी पाण्यानं वेढली जाते. जिल्ह्यातन, जगापासून दोन - दोन, तीन - तीन दिवस संपर्क तुटतो. अशा वेळी बाळंत बाईचं, म्हाता-याकोता-यांचं मरणच!"

 अक्षयच्या कानात त्याचा ज्युनिअर इंजिनिअर कुजबुजला, “खरं आहे सर, पण

लक्षदीप । १५५