पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फणींद्र माथा मुकुटी झळाळी । कारुण्य सिंधू भवदुःख हारी ।। तुजवीण शंभो मज कोण तारी । सारी तामुलवाडी निसर्गाच्या तांडव प्रतापानं भयभीत होऊन दिवाभीताप्रमाणे वळचणीला बिलगली असताना हा नि:संग गोसावी त्या पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सचैल स्नान करून आला होता व शिवस्तुती गात गाभा-यात पूजेला बसला होता! "अनुहत शब्द गगनी न माय । तिचे नि नादे भव शून्य होय ।। कथा निजांगे करुणा कुमारी ।। तुजवीण शंभो मज कोण तारी ।।। अभयनं घोंगडी बाजूला सारली व तो उठून गाभा-याजवळ गेला. मोरया गोसावीनं काजळी झाडल्यामुळे समईची वात दीप्तीमान होऊन गाभारा उजळीत होती. त्या प्रसन्न, उबदार, पवित्र प्रकाशात शिवलिंग झळाळत होतं. पांढ-या कण्हेरीच्या फुलात मोरया गोसावी शिवलिंग शृंगारत होता आणि पूजेचे मंत्र म्हणत होता - “पाद्यं ग्रहण देवेश सर्व क्षेमसमर्थ भो । भक्त्या समर्पित देव लोकनाथ नमोस्तुते ।।। मॅट्रिकला मेरिटमध्ये येण्यासाठी शंभरपैकी शंभर मार्क्स मिळतात म्हणून अक्षयनं दुसरी भाषा म्हणून हिंदीच्या ऐवजी संस्कृत घेतलं होतं. त्यामुळे मोरया गोसावी जे मंत्र म्हणत होता, त्याचा अर्थ त्याला समजत होता. त्या ब्राह्म मुहूर्तावर निसर्गाच्या प्रलयकारी तांडवाच्या पाश्र्वभूमीवर मंदिरात एकाकी नि:संग गोसावा रुद्ररूप शिवाची मनोभावे पूजा बांधीत होता. अक्षयचं क्षुब्ध मन हळूहळू शांत होत होतं. नकळत आजीने शिकवलेले बालपणीचे संस्कार जागृत होत होते. त्यानं गुडघ्यावर बसून नकळत हात जोडले होते. तामुलवाडीला अशा एका शिवाची व मोरया गोसावीसारख्या शिवभक्ताचा जरुरी होती - किमानपक्षी त्यांचे मन शांत ठेवायला मदतगार सिद्ध होणारी होती. आजवर आयुष्यात कधी पूजा न केलेला व आजीच्या मृत्यूनंतर चुकूनही कधी मंदिरात न गेलेला अक्षय आज भल्यापहाटे शिवमंदिरात वीरासन घालून, हात जोडून मारया गोसावीनं आरंभलेली पूजा पाहात होता. आणि मनातल्या प्रश्नांच्या तफानाला वाट शोधत होता... लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा । १५४ ॥ लक्षदीप