पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या इरिगेशनच्या शास्त्राप्रमाणे हे गाव उंचावर असल्यामुळे पूररेषेत येत नाही. तसा रिपोर्ट दप्तरबंद आहे. पण पाण्याचा वेढा पडतो. पूर प्रतिबंधक भिंत खर्चिक म्हणून होत नाही, तर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाला गाव - गावची घरं, वाड्या, एकूण गाव पण पूररेषेत यावं लागतं, तरच शासन मंजुरी देतं..."
 जुन्या जाणत्या, खात्यात मुरलेल्या तहसीलदारांनी फाईल पाहून नेमकं हेच उत्तर फेकलं, पण तामुलवाडीच्या सरपंचाचं व ग्रामस्थांचं त्यानं काही समाधान झालं नाही. होणं शक्यही नव्हतं!
 गावची किती माणसं मेली म्हणजे तुम्हाला या प्रश्नाची तीव्रता समजणार आहे?” एका ग्रामस्थानं संतापानं विचारलं, तेव्हा नव्याने निवडून आलेले आमदार चपापले. त्यांनीही निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी या गावाला भेट दिली नव्हती. कारण नदीतून बारमाही टोकरा - छोटी होडकी - चालायची. यातून पैलतीरी जायचे व पुन्हा अर्धाएक मैल रान तुडवायचं... प्रचाराचा अर्धा दिवस मोडला असता या व्यावहारिक हिशोबानं आमदारांनी तामुलवाडी टाळली होती!
 त्यांनी अक्षयकडे पाहिलं- त्यांच्या नजरेतला मथितार्थ त्यानं जाणला. आमदारांना हा उमदा, उच्चविद्याविभूषित तरुण आवडला होता. त्याचं उच्चशिक्षण, डिग्री यांचे खात्यात फारसं चीज होणार नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं! पण त्याला ग्रामीण भारत पाहायचा होता, आयुष्याची किमान दोन - तीन वर्षे त्याला ग्रामीण भागाच्या पुनर्रचनेसाठी द्यायची होती. त्यात अपयश आलं तरी धोका नव्हता. त्याचा आयआयटीची डिग्री त्याला केव्हाही २५ - ३० हजारांची नोकरी मुंबई-पुण्याला द्यायला समर्थ होती!
 अक्षय म्हणाला, “आज बैठकीनंतर आपण तामुलवाडीला जाऊ या. तहसीलदार साहेब पण आले तर बरं होईल! या गावचा प्रश्न पुनर्वसनापेक्षाही जादा, इतर भागापासून पुराच्या वेळी कटऑफ होण्याचा आहे - वेढा पडून जगाशी संपक तुटण्याचा आहे... नेमकी कोणती बाब कमी खर्चाची राहील हे मी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर सांगू शकेन... पुनर्वसन हा कधीही केवळ तांत्रिक प्रश्न असू नये. त्यात मानवी भावनेची बाजू आणि गावाचे लोकेशनही महत्त्वपूर्ण ठरतात..."

 सरपंच त्याच्याकडे अवाक होऊन पाहात राहिले. हा काल आलेला कॉलेज कसारासारखा दिसणारा इंजिनिअर वाडी न बघता नेमकेपणानं प्रश्नांची गुंतागुंत कि सहजतेनं उलगडून दाखवत होता.. गेली पंधरा वर्षे ते सरपंच होते व तेव्हापासून गावाच्या पुनर्वसनासाठी झटत होते. पण क्लिष्ट कायदे व तांत्रिक नियम याच्या त्यांच्या गावचा प्रश्न चपखलपणे बसत नव्हता. मुख्य म्हणजे वरिष्ठ अधिकार टोकयातन पैलतीरी येऊन पाहण्याचे कष्ट घेत नव्हते व खालच्या कर्मचा-याच तांत्रिक ज्ञान ठीकठाक असले तरी त्यातून कसा मार्ग काढायचा याची प्रज्ञा व अधिकार

१५६ । लक्षदीप