पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माय बॅकग्राऊण्ह अॅण्ड एस. सी. कास्ट, त्यावर मात करीत क्रिकेट जगतात मला माझ्या नावाची लखलखती मुद्रा कोरायची आहे आणि मी ती कोरणार आहे."
 पहिल्या तीन - चार वर्षांत हॅम फॉर्मात असताना सॅमच्या जोडीनं त्याची नाममुद्रा लखलखीत होती, पण जेव्हापासून त्याला वगळलं गेलं, त्याचे तिन्ही कम बँक ते तेज पुन्हा आणू शकले नाहीत. आज ती नाममुद्रा पुसट होत चालली आहे.
 पण तो खरंच फायटर आहे. लढवय्या आहे. प्रत्येक कम बॅकनंतर खेळताना तो कधीही दडपणाखाली खेळला नाही, पण ग्लोरियस अनसर्टनटीसाठी क्रिकेट मशहूर आहे. प्रत्येक वेळी अप्रतिम चेंडूवर हाणामारीच्या शेवटच्या हाताघाईच्या षटकात किंवा दुस-याच्या चुकीच्या कॉलमुळं बाद होणं हॅमच्या वाट्याला सातत्यानं येत गेलं आणि निवड समितीला वगळण्यासाठी कारणं मिळत गेली.
 मागच्या वर्ल्डकप सिरीजच्या सेमीफायनलला भारत हरला. तेव्हा फोर डाऊन आलेला हॅम एक बाजू लावून शेवटपर्यंत खेळत होता. पण सॅमनंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भारताचा डाव कोसळत गेला. पॅव्हेलियनला परतणाच्या हॅमच्या डोळ्यात पाणी होतं. ते टीव्हीच्या कॅमे-यातून जगभराच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होतं. हॅमची तीव्र निराशा प्रामाणिक होती, पण विदूषकी प्रतिमा प्रसारमाध्यमांनी त्याला चिकटवल्यामुळे त्याची पण प्रचंड टिंगल झाली. त्याला त्या सिरीजनंतर वगळण्याचं ते पण एक एक ऑफिशिअल कारण होतं. असं निराश मनानं सॅमनं त्याला सांगितलं तेव्हा न पेलणारा मर्मातक धक्का बसला होता.
 "सॅम, जस्ट इमॅजिन! माझ्या जागी तू असतास, तुझ्या डोळ्यात इंडियाच्या पराभवानं पाणी आलं असतं तर तर मीडियाने देशप्रेमी, सच्चा हिंदुस्थानी’ अशा वेचक शब्दांनी स्मृतिसुमनं तुझ्यावर उधळली असती. कारण शेवटी तू हीरो आहेस आणि मी जोकर - हास्यास्पद ब्लॅक, लो कास्टचा... आणि ऑफकोर्स लो टेस्टचा.”
 मागच्या वर्षी एका मॅचमध्ये कॅप्टनच्या जागी बदली खेळाडू म्हणून तो क्षेत्ररक्षणासाठी उतरतो काय आणि नंतर प्रचंड वेदनेनं विव्हळत हॅम स्ट्रेचरवरून परततो काय! कागद टर्रकन फाडावा, तसेच त्याच्या डाव्या पायाचे स्नायू फाटले होते. एक बॉल अडविण्यासाठी पायानं प्रयत्न करताना विचित्र पद्धतीनं तो पडला होता. सुमारे सहा महिने पाय फ्रेंक्चरमध्ये होता, पण त्यातूनही तो जन्मजात लढवय्या गुणांच्या आधारे बरा होऊन उठला होता आणि रणजीत पुन्हा खेळताना चमक दाखवत होता. त्यामुळे पुन्हा एकवार कम बॅकची उमेद बाळगून होता.
 “निलू डार्लिंग, आता मला संधी मिळाली ना, तर मी त्याच सोनं करीन. मी नाही, माझी बॅट बोलेल आणि पुन्हा भरधाव वेगानं लिफ्टनं जात सॅमला गाठायचा प्रयत्न करीन... जस्ट सी माय डिअर, आय मीन इट, आय मीन इट."

 पण निवड समितीनं पुन्हा एकवार त्याला वगळलं होतं आणि अध्यक्षांना

१२२ । लक्षदीप