पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतर कुणाला साधं पोहोचणंही दुरापास्त व्हावं अशा उच्चस्थानी जाऊन बसला. हा इतिहास अगदी काल-आजचा आहे व भारतातल्या शेंबड्या पोरालाही तो ज्ञात आहे. आपण मात्र त्या पहिल्यावहिल्या झंझावाती यशाच्या धुंदीत भरकटत गेलो आणि ज्या गतीनं सँग पराक्रमाची पर्वत शिखर चढत होता, त्यापेक्षा अधिक गतीनं पराभवाच्या दरीत आपण कोसळत होतो. का व कसं झालं हे कळलं नाही आणि आता फार उशीर झाला आहे.
 “निलू, माझे काकदृष्टीचे व माझ्या वगळण्यानं खूश होणारे पत्रकार माझ्यावर टीका करताना म्हणतात," एकदा हॅम तिच्यापुढे अशाच एका विकलांग दुबळ्या क्षणी कन्फेशन द्यावं, तसा कबुली जबाबाचा पाढा वाचत म्हणाला होता,
 “मी - मी भरकटत गेलो. यशाची धुंदी मला फार लवकर चढली आणि चित्रविचित्र चाळे, भडक रंगीबेरंगी ड्रेसेस घालणं, कानात भिकबाळी घालून कधी, तर कधी चमनगोटा कर, रात्ररात्र डिस्कोमध्ये घालव... त्यांच्या काकदृष्टीतून त्यातलं काही, काहीसुद्धा सुटलं नव्हतं. पण क्रिकेट जगतात असं करणारा मी एकटाच नव्हतो. मी एवढे अभावाचं जगत आलो होतो की पुढ्यात आल्यावर ओरबाडल्याप्रमाणे दोन्ही हातांनी सुख व भोग ओरबाडत गेलो, पण मैदानात बँट तळपळतच होती, हे ते सोईस्कर विसरतात. केवळ दोन सामन्यात मी खराब खेळलो. एकदा विकेट फेकली आणि फिल्डिंग पुअर आहे म्हणून मला वगळण्यात आलं. पुन्हा मी जिद्दीनं खेळून कम बॅक केलं, पण माझी निवड केवळ पहिल्या दोन सामन्यांसाठीच होती. त्यात एका सामन्यात सॅमला मी ब-यापैकी साथ दिली. त्यानं आत्मविश्वास येऊन दुस-या सामन्यात मी माझ्या नेहमीच्या नैसर्गिक शैलीत खेळत वेगानं धावा जमवत असताना मुरलीधरनच्या एका अप्रतिम बॉलवर बाद झालो. अशा बॉलपुढे मीच काय, सॅम काय, बॅडमन व गॅरी सोबर्सही बाद झाला असता. पण मला पुढील तीन सामन्यात बारावा गडी केलं व नंतर वगळलं...."
 निलूला त्याचं पूर्ण क्रिकेटिंग करिअर माहीत होतं. जयपूरचा त्याचा पहिलावहिला वन डे इंटरनॅशनल तिनं पाहिला होता आणि त्या अप्रतिम खेळीनं ती त्याच्या प्रेमात पडली होती. खेळाच्या दरम्यान चौकार व षटकार मारला की, तो गळ्यातलं पदक काढून त्याचं चुंबन घ्यायचा आणि आकाशाकडं पाहायचा. निलूला वाटलं होतं, त्याची कुणी गर्लफ्रेण्ड असणार व तिचा फोटो पदकात असणार आणि आकाशाकडं पहिणे त्याच्या ख्रिश्चॅनिटीची निशाणी दर्शवीत होती, पण त्या दोन कृतीतील रहस्य जेव्हा तिला समतलं. ती अवाक झाली होती.

 “निल, पदकात आम्हा दलितांचे देव - आदर्श असलेल्या बाबासाहेबांचा फोटो आहे. ते मला सदैव स्फूर्ती देतात आणि आकाशाकडे पाहणं म्हणजे अंगराज कर्णाप्रमाणे त्या विश्वतेजाशी तादाम्य साधणं होय... आय अॅम नॉट अशेम्ड ऑफ

लक्षदीप । १२१