पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समोरच्या टीपॉयवर ठेवले आणि कोचात डोळे मिटून शांत पहुडला. शरीर स्वस्थ असलं तरी अस्वस्थ मन खदखदत होतं.
 अस्वस्थ वाटणारा मनाचा उद्रेक शांत व्हावा म्हणून त्यानं पुन्हा टीव्ही ऑन केला. व्हीनस व सेरेना विल्यमची मॅच संपली होती व विजेती व्हीनस बक्षिसाचा करंडक उंचावत प्रेक्षकांना अभिवादन करीत होती. हॅमला तिच्या घामानं निथळणाच्या चेह-यावर विजयाचं स्मित पाहताना त्यामागची किलर इन्स्टिंक्टची ओतप्रोत भरलेली भावना स्वच्छपणे वाचता येत होती.
 आपल्या व्यक्तिमत्त्वाचा तो अविभाज्य भाग असलेला किलर इन्स्टिंक्ट कुठं गेला? क्रिकेटचा समालोचक लेखक द्वारका त्याचा उल्लेख नेहमी लढवय्या असा करायचा. काही वर्षापूर्वी एका लेखात त्यानं हॅमच्या आत्मविश्वासाबद्दल लिहिताना त्याच्या क्रिकेट कसोटीच्या पदार्पणाच्या मोसमातली एक हकिकत वर्णिली हेती. त्यातला शब्दशब्द त्याच्या आजही स्मरणात आहे. सॅम तेव्हा म्हणाला होता, “या द्वारकानं जे लिहिलं ते एकदम अचूक आहे त्यानं तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा अर्कच जणू या घटनेद्वारे पेश केला आहे."
 द्वारकानं आपल्या रसिल्या बहारदार शैलीत लिहिलं होतं. “आमचा हॅमही असाच लढवय्या आहे आणि आत्मविश्वास तर त्याचा लहानपणापासूनचा मित्र आहे व ती मैत्री अतूट आहे. त्याची एक लहानपणीचा रणजीमधील पदार्पणाचा किस्सा सांगतो. थेट शाळेतून सॅमसोबत मुंबईच्या संघात आलेला हा पोरगा. मुंबई संघात तेव्हा नव्या पोरांना दबदबा वाटावा अशा दिलीप, संजय, लालू, संजू व रवीसारख्या कसोटी वीरांचा भरणा होता, पण हॅम असा वावरत होता की जणू तो त्याच्या शाळेच्या मैदानावरच आहे.
 टू डाऊनवर फलंदाजीला जाताना कॅप्टननं त्याला सांगितलं, तू तुझा नैसर्गिक खेळ कर. त्याने कर्णधाराची आज्ञा शिरसावंद्य मानली, पहिले दोन चेंडू मैदानाबाहेर फेकले. नाबाद अर्धशतक झळकावून तो लंच टाईमला ड्रेसिंग रूममध्ये परतला आणि हसत सहका-यांना म्हणाला, 'हे काय, शैम्पेन कुठं आहे? बरं, ते जाऊ दे.' आणि त्यानं थम्सअपची बाटली उंचावली. बूच उघडून ती रॉम्पेनसारखी उडवली. हा उद्धटपणा नव्हता तर वरच्या स्तरावरचा आत्मविश्वास होता. हॅम आधीच्या दोन सामन्यात शून्यावर बाद होऊ दे. पण पुढील सामन्यांत खेळायला अशा आत्मविश्वासानं जाईल की, त्यानं आधीच्या सामन्यात झंझावाती शतक केलंय. असा हा आत्मविश्वास व मानसिक शक्ती अपवादरूप अशी दुर्मीळ आहे."

 मनोपृष्ठावर द्वारकाच्या त्या लेखातल्या ओळी उमटल्या होत्या आणि त्याच्या स्मृतानंच त्या हॅमला पाठांतर चोख केलेल्या शाळकरी मुलानं वक्तृत्व स्पर्धेत घडाघडा भाषण करावं अशा म्हणून दाखवल्या होत्या. पण त्यानं मनाला उभारी

लक्षदीप । ११९