पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटली नाही, की दिलासा मिळाला नाही. तो अधिकच निराशेच्या गर्तेत कोसळत गेला.
 समोर टीव्हीवर व्हीनस व सेरेनाच्या त्या ऐतिहासिक मॅचची क्षणचित्रे दाखवली जात हेती. १८८४ साली लिलयन व मॉड वॉटसन य गो-या भगिनींची विम्बल्डनची जेतेपदासाठी लढत झाली होती. त्यानंतर तब्बल ११७ वर्षांनी दोन कृष्णवर्णीय भगिनींमध्ये सामना झाला होता.
 दर्बनच्या वंशवादाच्या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर वर्णभेदावर मात करीत, गोच्या मानसिकतेला आव्हान देत टेनिसच्या सम्राज्ञीपदावर हक्क सांगणाच्या विल्यम भगिनींशी माझं दु:खाचं, वेदनेचं नातं आहे. ब्लॅक अमेरिकन हे रंगभेदाचे बळी, तर मी दलित म्हणून जातीव्यवस्थेचा बळी, आज जशा दिमाखदारपणे विल्यम भगिनी वा आपल्या क्रीडा कारकीर्दीमध्ये कार्ल लुईस व फ्लो जो हे अॅथलेटिक वर्णद्वेषी अमेरिकन जगतात गोच्या अहंकाराला चिरडीत सर्वोच्च स्थानी पोहोचले, तशीच आपली क्षमता होती. हे। केवळ माझा मित्र सॅमचंच नव्हे, तर सान्यांचंच मत हेतं.
 खरं तर आपल्याला सॅमच्या जोडीनं बरोबरीनं भारतीय संघात प्रवेश मिळायला हवा होता, पण त्याच्यानंतर दोन - अडीच वर्षांनी संधी मिकळी. तेव्हाच प्रथम जातिभेदाची जाणीव झाली. त्याची नंतरच्या काळात तीव्रता कमी झालीय, पण मनाच्या पापुद्र्याआड ती अद्यापही लखलखती आहे, हे जाणवतं होतं. तरीही मिळालेल्या पहिल्या संधीचा फायदा घेऊन द्वारका म्हणतो तशा आत्मविश्वास व लढवय्येपणाच्या बळावर आपल्या बॅटीचं आपण पाणी दाखवून दिलं. लागोपाठ दोन कसोटी सामन्यात दोन द्विशतके आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पणातच शतक झळकवीत ‘मॅन ऑफ द मॅच' चा सन्मान जिंकत भारताला मिळवून दिलेला विजय आपल्याला सॅमच्या पंक्तीमध्ये घेऊन गेला.
 तेव्हा हॅमनं एका पत्रकाराला एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं, “मी सॅमनंतर अडीच वर्षांनी आलोय. त्याला गाठायचं असेल तर जिने चढून गाठता येणार नाही म्हणून मी लिफ्टनं भराभर वर जात आहे."
 सॅमनं तेव्हा दाद देताना म्हटलं होतं, “वेल सेड फ्रेण्ड, वेल सेड. पण तुझ विधान अर्धसत्य आहे. तू लिफ्टनं वर केव्हाच पोहोचला असून माझी तिथं येण्याचा सच्च्या मित्राप्रमाणे वाट पाहात आहेस."
 हॅमचं मन त्या आठवणीनं रोमांचित होत फुलून आलं, पण क्षणभरच. पुन्हा केटचं मैदान व पराक्रम गाजवीत जातीद्वेषावर मात करीत पुढे येण्याची युद्धभूमा पण आता कायमची गमावून बसवलो आहोत, या विदारक जाणिवेनं पुन्हा मन कडवटलं गेलं!

 आपला तो मित्र हां हां म्हणता वर आला व आपल्यालाही मागं टाकून जिथे

१२० । लक्षदीप