पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "पण इथं येण्यापूर्वी भाकरी - भाजीवर जगली, वाढली. त्यावरच तिचा पिंड पोसला गेला आहे. पण शरीराची खेळाडू म्हणून काही अंशी वाढ कमी पडतेय - असं दिसतंय."
 मंजुळेला हे सारं स्मरलं आणि तिच्या आक्रंदनाचा, “मी, मी, बाईच आहे. मीना आहे, मर्दसिंग नाही. याचा अर्थ आता कुठं थोडा - थोडासा उमगत गेला, पण त्याला बराच उशीर झाला होता.
 लिंगचाचणीमध्ये ती सपशेल ‘फेल' झाली होती आणि आशियाई ऑलिम्पिक असोसिएशननं तिचं रौप्य पदक काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून ती गावीच होती. बरं नाही म्हणून मीना चार दिवसांसाठी परवानगी घेऊन प्रबोधिनीतून पाथरूडला आपल्या घरी गेली होती आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी कानी आली. तशी मंजुळा व सुरेशबाबू आठ तासांचा प्रवास करून तिला पाहायला पाथरूडला आले होते.
 "मी-मी बाईच आहे हो भाभी, मीना आहे, मर्दसिंग नाही."
 या जेमतेम दोन शब्दांनी मागील दीड महिन्यात तिनं काय भोगलं असावं. याचा लख्खपणे मंजुळेला जाणीव झाली. आपण बाई असून तिला समजू शकलो नाही. आज सारं जग तिच्या स्त्री असण्यावर अंगुलीनिर्देश करतंय, इंटरनेटवर सर्च इंजिनवर ‘ती (She) का तो (He)' असे खोचक प्रश्न विचारणाच्या कॉमेन्टस् येत आहेत. कसं सहन केलं असेल तिनं?
 आता तर आशियाई ऑलिम्पिक असोसिएशननं तिचं बाईपण स्पष्टपणे नाकारले होतं व ती गुणसूत्रांच्या आधारे स्त्री नसून पुरुष आहे, असं जाहीर केले होते. लिंगचाचणीमध्ये फेल होणं याचा हाच अर्थ होता.
 मीनाला पण लहानपणापासून का तिच्या स्त्रीत्वाची शंका होती? तिला वयात आल्यावर पाळी आली नाही, हे मंजुळेला माहिती होतं, पण काही शारीरिक दोषामु असं अनेकींच्या बाबतीत घडतं. तिची एक भाची अशीच होती. पण तिचं लग्नहीं आ झालं आहे. वैषयिकदृष्ट्या ती सुखी आहे व नव-याला कामसुख देऊ शकते. फक तिला मूल होणार नाही एवढंच. बाकी त्यांचा संसार सुखात चालू आहे. एक के म्हणून बाकीचे परिपूर्ण जीवन ती जगते आहे.

 नेमकी कुठली लिंग परीक्षा घेतली असेल दोह्याला? त्याचा एक वकील म्ह मला शोध घेतला पाहिजे. मंजुळेच्या मनात विचारांची चक्रे गरगरत होता. या सेऊलला तिला पदक मिळालं होतं, तेव्हा ती स्त्री नव्हती? तेव्हा तिची लिंगचाचणी घेतली नव्हती, की त्यात ती उत्तीर्ण झाली होती? आताच असं काय घडलं की, तिला प्रथम १५०० मीटर्सच्या शर्यतीत धावू दिलं नाही आणि नंतर लिंगचाचणीत ती फल याल्याचे जाहीर करून तिच्या ‘मर्दसिंग' म्हणून उपहासानं होणा-या टीकेवर

१० ॥ लक्षदीप