पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्कामोर्तब केलं आहे.
 “सुरेश, माझी गट फिलिंग सांगतेय. यात काहीतरी गेम आहे. मीनावर अन्याय झालाय, असं मला वाटतंय. एक वकील म्हणून असं असेल तर मी लढेन. भारतीय व आशियाई ऑलिम्पिक महासंघास कोर्टात खेचून आव्हान देईन."मंजुळाच्या शब्दाशब्दांत निर्धार व अन्यायाची चीड झळकत होती.
 “होय मंजुळा, मलाही तसंच वाटतंय. आपण दोघं लिंगचाचणी परीक्षेचा वैद्यकीय व तांत्रिक अभ्यास करू, काही डॉक्टर्स व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलू आणि ठरवू पुढे काय करायचं ते - सुरेश म्हणाले, “गेली पाच वर्ष माझ्या हाताखाली मीना सराव करतेय. मला कधी जाणवलं नाही की, तिच्या स्त्रीत्वाबद्दल शंका आली नाही."
 मंजुळा विचार करीत होती. स्त्री म्हणून मीनाची शरीरकृती नजरेसमोर आणून तिच्या स्त्रीत्वाच्या संदर्भात तपासून पाहात होती. मीना कृश आहे. छाती व नितंबाचा भागही सपाट आहे. ब्लेझर घातल्यावर केसांचा बांधलेला अंबाडा सोडला तर ती मुलगा आहे असंच वाटू शकतं. पण अशा मुली असतातच की, पुन्हा स्त्रीत्व का हे। अशा बाह्य खुणांवर अवलंबून असतं? किमान जीवशास्त्रीय गुणसूत्राप्रमाणे मीना बाईच असेल की.. का जेंडर टेस्ट प्रमाण मानली तर ती स्त्री नाही?
 तिनं मनात आलेल्या या सर्व शंका सुरेशपुढे मनाची खदखद कमी व्हावी म्हणून व्यक्त केल्या. खरंतर तिचं हे स्वैर विचारचिंतन होतं. तरीही त्यातली सार्वत्रिक सत्यता सुरेशलाही पटत होती. काहीसा विचार करीत तो म्हणाला.
 “मंजुळा, यू आर थिंकिंग ऑन राईट ट्रेक. तिच्यात कदाचित स्त्रीत्वाला तु म्हणालीस त्या बाह्य खुणा कमी विकसित झाल्या असतील; पण तरीही ती स्त्रीच आहे, असं मलाही ठामपणे वाटतं. आणि त्यामागं एक ठोस कारण आहे."
 “ते कोणतं?"
 "आठवतं का तुला, तिचं त्या किशोर दांगट या कुस्तीगीरासोबतचं गाजलेलं अफेअर? तेव्हा आपण समुपदेशनाचा आधार घेऊन नाजूक हातानं गुंता सोडवला होता. त्यांना मित्र राहण्यास आपण मज्जाव नाही केला; पण दोघांनी प्रबोधिनीत असताना आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचं ध्येय विसरू नये, असं सांगून त्यावर पडदा टाकला होता."

 मंजुळेला किशोर आठवला. एका रात्री त्याच्या खोलीतून बाहेर पडताना तिला तिनं व सुरेशनं हॉस्टेलचा राऊंड घेताना पकडलं, तेव्हा तिचा फुललेला चेहरा आणि विस्कटलेले केस व कपडे पाहून मंजुळेला मनानं धोक्याचा इशारा दिला... प्रकरण बरच पुढं गेलं आहे. बालेवाडी शासकीय प्रबोधिनी असल्यामुळे त्याचा गुंता नाजकपणे सोडवता आला, याचंच त्या दोघांना त्यावेळी हायसं वाटलं होतं.

लक्षदीप ॥ १० १