पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरवला. मात्र, त्यावेळी १५०० मीटरमध्ये तिला खेळू दिलं नाही. त्यावेळी त्याचं कारण मॅनेजरनं सांगितलं नाही. पण मनात ती दडून बसलेली भीती उफाळून आली होती. लहानपणी शिवा पारध्याला बेड्या ठोकल्यावर त्याला जेलमध्ये नेण्यासाठी पोलीस जीपमध्ये बसवत होते, तेव्हा बसताना तुच्छेतेनं पचकन थुकन तो मीनाकडं पाहत म्हणाला, “ही काय बाय आहे? तिचं नाव बदला साहेब, मीना नाही, मर्दसिंग - मर्दसिंग." जेंडर टेस्टमध्ये काही गडबड झाली का? अशी शंका आली आणि ‘मर्दसिंग' हा शब्द तिच्या मनावर घणाचा घाव घालू लागला.
 “नाही - नाही, मी - मी... बाईच आहे, मर्दसिंग नाही." अचानक किंचाळत मीना ताडकन उठून बसली आणि समोर पोलीस व डॉक्टरांना पाहताच गुडघ्यांत मान खुपसून हुंदके देऊ लागली.
 तिच्या पाठीवरून मायेचा चिरपरिचित हात फिरला. तिनं मान वर करून पाहिलं, समोर मंजुळाभाभी उभी होती. तिचे गुरू सुरेशबाबूंची पत्नी व साच्या विद्यार्थ्यांची दुसरी आई आणि बरंच काही. गाईड, फिलॉसॉफर, पेशानं वकील, पण पती मार्गदर्शक असल्यामुळे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना आपलं विशाल कुटुंब मानणारी मंजुळाभाभी, तिला पाहताच मीनाला पुन्हा उमाळा दाटून आला. तिनं नि:संकोचपणे भाभींच्या कमरेला मिठी मारली व स्फुदत म्हणाली, “पहिल्यापासन सांगत आले आहे व आज पुन्हा सांगते... मी बाईच आहे हो, पण हा शब्द माझा पिच्छा सोडत नाही - ‘मर्दसिंग!' "
 मीना आता एकवीस वर्षांची आहे. अजूनही तिची पाळी सुरू झालेली नाहीय, हे मंजुळेला माहीत होतं! पण आजवर मीना इतकी जवळची आणि तिचा लाड असूनही त्याबाबत मंजळेचं त्याचा एक खेळाड म्हणून होणाच्या परिणामा गेलं नव्हतं!
 मीनानं दोह्यामध्ये ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पूर्ण भारताची शान वाढवीत रौप्य पदक संपादन केल्यानंतर तिच्याबद्दल सुरेशबाबू आणि मजुत 3" " दिवशीच्या १५०० मीटर दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. इथ तिला सुवर्ण पदक अपेक्षित होतं. पण ती खेळलीच नाही. पायात गोळा आल्याचे व तात्र 'मसल पेनचं कारण सांगणाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे वृत्तपत्रातील जाहीर झालेल्या """""पाना हळहळ वाटली. “बिचारी, ऐनवेळी तब्येतीनं घात केला, नाही तर " मंजुळेनं म्हटलं, त्याला पुष्टी देताना सुरेशबाबू म्हणाला हात
 हा ना, प्रबोधिनीचा सकस आहार असूनही, तिच्या तब्येतीत काही फारसा फरक पडला नाही. तिच्यात वल्र्डक्लास रनिंगचे सर्व गुण जन्मजात आहेत, पण

मना कमी पडतो. एका दिवसात दोन किंवा सलग दोन दिवसात दोन आंतरराष्ट्रीय शर्यतीमध्ये ती तोकडी पडते. खास करून दुस-या शर्यतीमध्ये."

लक्षदीप ॥ ९९