पान:लंकादर्शनम्.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


• ६६ ४०० ते ७०० पौंड चहा होतो. | चहाचे झाड खच्ची न केले तर ३० फुटापेक्षाही जास्त उंच होते. परन्तु पाने खुडण्यास सोयीचे जावे म्हणून ३-४फुटापेक्षा जास्त वाढ होऊ देत नाहींत व सुमारे १६ ते ४८ महिन्यांनी झाडांची छाटणी करितात. जमीनदार लोक मळ्यांतच बंगले बांधून रहातात. कामकरी वर्गाला मळ्यावर राहण्याकरितां चाळी बांधून दिलेल्या असतात. कामकन्यांना खाद्यपेय पदार्थ कपडा वगैरे सामान घेण्यास बाजारांत दूर जावे लागू नये म्हणून मालक मळ्यावर दुकानें चालावतात. मजुरांना बाहेर जाण्याची बंदी असते व बाहेरील लोकांस मजुरांकडे जाऊन उगाच गप्पा मारूं देत नाहींत. । सूर्योदयाचे सुमारास ब्यूगल वाजतो व आवाजावरोवर मजुरांचे ताडेचे तांडे हजेरी देण्याकरितां येतात. या मजुरांत तामील, पुरुष, स्त्रिया व मुले यांचाच भरणा विशेषतः जास्त असतो दुपारी १२ वाजण्याचे सुमारास १ तास जेवण्यास सुटी मिळते नंतर पुन्हां ४-३० वाजेपर्यंत त्यांचे कडून काम करून घेण्यांत येते. पाने नीट रीतीनें खुडतां यावीत म्हणून झाडे ३-४ फुटापेक्षां जात ऊंच वाढू देत नाहींत. दर ८-१० दिवसांनी पानांची तोडा करितात . फुलांचा बहर येण्याच्या सुमारास ( मार्च ते जून हा मोठा मोसम, अक्टोबर ते नोव्हेंबर हा धाकटा मोसम ) पाने खुडण्याचे काम विशेष जोराने चालते. मजर पाने व कळ्या खुडून त्यांच्या प्रति लावितात. १ पौंड पाने तोडली म्हणजे १ ते २ वै मजूरी मिळते. पूर्वी मजूरांचे प्रमाण फारच अल्प पडत असे. गेल्या ८-१० वर्षात सीलोन कौन्सिलने मजूरीचें कमीत कमी प्रमाण दर महिन्यास १५ रु. असावे असे ठरविले आहे. या पगारांतून अन्नसामुग्री व कपड्याची किंमत कापून घेण्यांत येते. कायद्याने पगाराचे किमानप्रमाण ठरविण्यापूर्वी मजुरांची फारच हलाखीची स्थिति होती. मजुरांची रहाण्याची सोय चांगली नसणे, अजारी