पान:लंकादर्शनम्.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९

 १ जमीन शंभर एकर :- दर एकरी हजार रु. या प्रमाणे एक लक्ष. रु.

 २ जंगल सफाई, बी वियोणे, यंत्रसामुग्री मंजुराकारितां चाळी वगैरेचां प्राथमिक खर्च  :- साठ ते पासष्ठ हजार.

पहिल्या पांच वर्षांत मळ्याचा खर्च भागत नाहीं. पांच वर्षानंतर उत्पन्नावर मळ्याचा खर्च भागतो. सात वर्षानंतर उत्पन्न मिळू लागते. दहा वर्षानंतर शंभर एकराच्या मळ्यावर निदान एकलक्ष रुपयांचे उत्पन्न राहते. एकदां मळा लावल्यावर त्याचे उत्पन्न अनेक वर्षे मिळत राहते. येथपर्यंत दिलेल्या हकीकती वरून चहाचा धंदा किती मोठा आहे याची कल्पना येईल. हिंदुस्थानांतील मळेवाल्यांचा वार्षिक नफा सुमारे वीस कोटींची आहे असे म्हणतात.

 पाश्चात्य भांडवलवाल्यांनी ही महत्वाची उत्पन्नाची बाब बहुतेक सर्वस्वी हस्तगत केलेली आहे. सीलोनमध्ये पर्वतावर जातांना सर्वत्र चहाचे मळे दिसतात. चहाची लागवड कशी करितात हेही समजणे जरूर आहे.

 चहाचे बी सुमारें मध्यम आकाराच्या सुपारी एवढे असते. प्रथमतः बी रुझत घालतात. १२ ते १८ महिन्यांत रोप सुमारे पेन्सिली इतके जाडीचे होते. नंतर ते रोप कायम जागी नेऊन लावितात. पुढे १२-१३ महिन्यांनी रोपाच्या मुख्य दांड्याची ६ इं. उंचीवर छाटणी करितात. या योगे बाजूच्या फांद्यांची फूट जोराने होते; नंतर पुन्हा १|| वर्षानी फूट दीड उंची राखून रोप खच्ची करितात. या शेवटच्या छाटणीनंतर ५-६ महिन्यांनी चहाची पत्ती गोळा करता येते. चहाचे पान गुलाबाचे पानासारखे असते.

 चहाचे झाडे कणखर असते, त्यामुळे हवामानास दाद न देतां तें झपाट्याने वाढते. समुद्र सपाटीपासून कित्येक हजारफूट उंचीवर व विशेषत: निवाऱ्याच्या दऱ्यांतून चहाची पैदास फार चांगली होते.

 लागवडीपासून ४ वर्षांनी दर एकरी १३० ते २०० पौंड चहा होतो. पुढे झाडे जशी जून होतात त्या मानाने उत्पन्न वाढते व दर एकरी