पान:लंकादर्शनम्.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१

पणांत औषधपाण्याची योग्य सोय न होणे वगैरे गोष्टीबद्दल पुष्कळसा गवगवा वर्तमान पत्रांतून होत असे. दोन कुटुंबांतील ९ माणसे एका लहानशा खोलीत कशी कोंबण्यांत आली होती हे दाखविण्याकारतां सीलोन टाइम्समध्ये मागें एक फोटो प्रसिद्ध करण्यांत आला होता.

 चहाची पाने खुडण्याचा ज्यावेळी मोसम जोरांत नसतो त्यावेळी झाडांची आळी तयार करणे, रोपे तयार करण्यास जमीन तयार करणे वगैरे कामें मजूरांकडून करून घेण्यांत येतात.

 चहाची पाने खुडून तयार झाली म्हणजे प्रथमतः ती सुकवितात. पानांचे पातळथर तरटावर पसरून ते हवेच्या उष्णतेने सुमारे २४ तास सुकवितात. हवेतील उष्णतेने पाने सुकली म्हणजे ती एका यंत्रांत घालतात. यंत्रामध्ये एक रोलर ( लोखंडी रूळ ) असतो त्याने पानांतील राहिलेला ओलावा व टॅनिन ( कषायाम्ल ) काढून टाकतात. या यंत्रांतून पाने गुंडाळली जाऊन बाहेर पडतात. हे गोळे पुन्हा दुसऱ्या यंत्रांत घालून पाने वेगळी करतात.

 ही क्रिया संपल्यानंतर पानें अंबविण्याची क्रिया सुरू होते. पानांचा पातळ थर पसरून त्यावर ओले वस्त्र पसरितात. वस्त्राच्या ओलाव्याने व हवेच्या उष्णतेने पाने अंबून त्यांस काळा रंग येतो. अशा तऱ्हेने अंबविलेला चहा 'काळा चहा' म्हणून विकला जातो व न अंबविलेला चहा हिरवा म्हणून विकला जातो.

 अंबविण्याची क्रिया झाल्यावर पानांतील उरलेला ओलसरपणा काढून टाकण्यास सुरुवात केली जाते. लहान लहान परळांत पाने भरून त्यांस १८ फॅ. डिग्रीची उष्णता देतात व या उष्णतेने २० मिनिटांत पाने कोरडी होतात व ठिसूळ आणि काळा चहा तयार होतो. नंतर निरनिराळ्या चाळण्यांतून चहा चाळून घेऊन चहाची प्रतवारी लाविली जाते. पूड ही