पान:लंकादर्शनम्.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७
प्रांत मळे एकर (पैदास पौंड)
आसाम ९९८ ४३१००४ २४३२२९
बंगाल ३४६ १९९०८१ ८८४८२
बिहार ओरिसा २६ ३६४२ ८८६
संयुक्तप्रांत ३७ ६२५४ १३६६
पंजाब २४६४ ९६९३ १९०२
मद्रास ७७३ ७२३५१ २७५०८
कुर्ग ४१५ १७४
त्रिपारा बंगाल ४७ ८५५२ १६१४
त्रावणकोर १२५ ७१८४६ २८६७३
म्हैसोर १५ ४०३४ १८७
कोचीन ५२१ ५९

 उत्तर हिंदुस्थानांत डेहराडून, अलमोरा, कुमावन, गरवाल, नेपाळ, छोटानागपूर; पंजाबांत कांग्रा नदीचे खोरे, मंडी व शिरमूर संस्थान; दक्षिण हिंदुस्थानांत वायनद, निलगिरी, अन्नामलाई व त्रावणकोर मधील पर्वतांच्या रांगा येथे चहा पिकतो.

 हिंदुस्थान व सीलोन या देशांतून ६०० दशलक्ष पौंडाहून जास्त चहा तयार होतो. चहाच्या जागतिक पैदासीपैकी सुमारे १/७ ते १/८ भाग एकट्या सीलोनमध्ये होतो. हिंदुस्थानांतील बरेच मळे इंग्लंडांत स्थापन झालेल्या कंपनीचे असून तिची आफिसे लंडन, कलकत्ता, लिव्हरपूल, व ग्लासगो येथे आहेत. हिंदिकंपन्यांच्या मालकीचे व वैयक्तिक मालकीचे


 टीप :– जगांत एकंदर १८०० दशलक्ष पौंड चहा दरसाल पिकतो. त्यापैकी ८८० द. ल. पौंड चीनमध्ये ३९२ द. ल. पौंड हिंदुस्थानांत २२८ द. ल. पौंड सीलोनमध्ये, १४७ द. ल. पौंड डच ईस्ट इंडीजमध्ये ८१ द. ल. पौंड जपानमध्ये व ७२ द. ल. पौंड इतर देशांत होतो.