पान:लंकादर्शनम्.pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४५

फीची पैदासच कमी झाली. रबराची लागवड होऊन सन १८८१ साली रबराचे पहिले पीक आले, सिंकोनाची लागवड १८६० साली झाली व कोयनेल तयार होऊ लागले.

 अशा रीतीने ब्रिटिश अमदानींत रबर, चहा, कोको, नारळ, प्लंबगो वगैरेचा व्यापार पुष्कळच वाढला.

 सीलोनच्या इतिहासांत पुढील वर्षे विशेष लक्षात ठेवण्या सारखी आहेत.

खि. पूर्व स. ५४३ विजय सीलोनमध्ये गेला व त्याने राज्य मिळविलें.
 "  २५० तिस्स राजाने बुद्ध धर्माची दीक्षा घेतली.
 "  २०४ महेंद्राचा सूत्यु,
इ. स. १५०६ पोटुगीज लोकांनी आपली सत्ता स्थापली.
 " १६५६ डच लोकांनी पोटुगीजांस हांकून लाविलें.
 " १७९७ इंग्लिश लोकांनी डचांचा पराभव केला.
 " १८०२ इंग्लिश लोकांनी कॅडीवर चाल केली.
 " १८१५ सिंहली राजांचा शेवट.
 " १८४२ चहाच्या लागवडीस सुरवात.
 " १८६० सिंकोनाची लागवड.
 " १८७९ काफीचा रोगाने नाश.
 " १८८१ रबराचे पहिले पीक.

बुध्दधर्म


 सिंहलद्वीपामध्ये बुद्धधर्मीयांचा भरणा विशेष आहे. बुद्धधर्मीयांचा धर्म गोतमबुद्धाने स्थापन केला व बुध्दानें अहिंसा मताचा पुरस्कार केला यापेक्षां बुध्दधर्माची जास्त माहीती आपल्या इकडील फारच थोड्या सुशिक्षितांस आहे. ह्मणून बुध्दधर्माची थोडी माहीती दिली आहे.