पान:लंकादर्शनम्.pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४४

 पोर्तुगीज लोकांशीं डचलोक स्पर्धा करू लागल्यानंतर डच लोकांनी पोर्तुगीजांस सन १६५६ मध्ये हांकून लावून सीलोनमध्ये आपली सत्ता स्थापन केली. डच लोकांनीं खिस्ति धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. परन्तु डच लोक पोर्तुगीजा इतके जुलमी नव्हते.

 डच लोकांच्या अमदानीत दालचिनीची लागवड करण्याचा मक्ता सरकारडे असे सरकारी परवानगीवांचून थोडीशी जरी दालचिनी विकली, परदेशी पाठविली किंवा एखाद्या झाडास जाणून बुजून इजा केली तर त्या अपराधाबद्दल मृत्यूची शिक्षा मिळत असे.

 इंग्लिश लोकांनी डच लोकांचा इ. स. १७९७ मध्ये पराभव करून तेथे आपली सत्ता स्थापिली. सन १८०२ साली इंग्लिश लोकांनी कॅडीवर स्वारी केली पण तींत यश आलें नाहीं. कॅडीचा राजा जुलमी होता त्याचे व त्याच्या प्रजेचे भांडण होऊन इंग्लिशांचा आश्रय केला व त्यान त्यास राज्य त्याग करून दक्षिण हिंदुस्थानचा आश्रय करावा लागला व सन १८१५ साली इंग्लिशांची सत्ता चिरस्थायी झाली.

 इंग्लिश लोकांचे नशीबच उत्तम. त्यांची सत्ता वाढावयाची असली म्हणजे कोणीतरी जुलमी राजा उत्पन्न होतो व मग प्रजेच्या न्याय्य हक्काकारिता त्यांनां युद्धांत पडावे लागते. १७ च्या व १८ व्या शतकाचा इतिहास जर काळजीने वाचला तर इंग्लिश लोकांनी राज्यापहार करण्या करितां युद्धे केली नाहींत त्यांना केवळ लोकांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण कर ण्याकारतांच युद्धांत पडावे लागले असे दिसून येईल. सन १८१५ पासून सीलोन ब्रिटिशांच्या ताब्यांत आहे व तेथे कलानियल गव्हरमेंट आहे.

 इंग्लिशांच्या ताब्यांत हे बेट आल्यापासून तेथील व्यापार व उद्योग वंदे यांस चालना मिळाली. सन १८४२ मध्ये चहाच्या लागवडीस सुरवात झाली; काफीचे पीक येथे फार येत असे पण सन १८७९ मध्य काफीवर एक प्रकारचा रोग पडून त्याचा नाश झाला व तेव्हां पासून का