पान:लंकादर्शनम्.pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४६

 गोतम नेपाळच्या दाक्षण प्रांतीं खिस्तसनापूर्वी ५५७ साली कपिल वस्तु येथे जन्मला. हा तेथील शुध्दोदन नांवाच्या राजाचा मुलगा. जगाचे वीट आल्यामुळे बायकोचा त्याग करून तो काशीस जाऊन संन्याशांच्या सान्निध्यांत राहिला. पण त्याचे समाधान होईना. नंतर त्याने उपोषणे करण्यास सुरवात केली पण शांति मिळेना ह्मणून त्याने उपवास सोडले. गोतमानें व्रत भंग केला ह्मणून त्याचे मित्र त्यास सोडून गेले. नंतर निरंजना नदीचे काठी पिंपळाचे झाडाखालीं ध्यानस्थ बसला असता त्यास ज्ञान प्राप्त झालें.

 यानंतर त्याने आपल्या धर्माचा प्रसार केला. तिपिटक ( तीन टोपल्या ) नांवाच्या ग्रंथांत बुध्दधर्माची वाढ कशी होत गेली व त्यांतील मुख्य तत्वे काय आहेत ते पहावयास सांपडते.

 ईश्वर आहे की नाही, ते जगाचा उत्पत्तिकर्ती आहे की नाही या बद्दल बुध्दाने निश्चयात्मक मत कधीच दिले नाहीं. बुध्दाच्या धर्मास "मध्यम प्रतिपदा" मध्यम मार्ग असेंही एक नांव आहे. गिक मार्ग’- मुख्य आठ तत्वांचा पुरस्कार केल्यावरून- असेही नांव आहे.

 र्याचा आष्टाबुध्दघोषाचार्याने ‘विशुध्दिमार्ग' नांवाचा ग्रंथ लिहिला आहे व त्यांत बुध्दधर्माच्या सर्व तात्विक अंगांचा विचार करून “निर्वाण पद कसे प्राप्त करून घेता येईल ते सांगितले आहे.

 जगांत दुःख आहे. तृष्णेमुळे दुःख उत्पन्न होतं, मिळविला ह्मणजे दुःखाचा नाश होता. संपूर्ण दु:खांचा नाश झाला ह्मणज तृष्णेवर जय निर्वाण प्राप्त होते हेंच बुध्दधर्माचे मुख्य वीज आहे. निर्वाणाची कल्पना हिंदु लोकांच्या मुक्तीच्या कल्पनेप्रमाणे आहे असे ह्मणण्यास हरकता नाहीं.

 निवाणपद प्राप्त होण्याकरितां शील, समाधि आणि प्रज्ञा अशा त्रयीचा जरूरी असते. शील ह्मणजे तृष्णेवर जय मिळविण्याकरितां पाळावयाच नियम. हे नियम फारच कठीण असत