पान:लंकादर्शनम्.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०

मंडळाचा अधिका-यांच्या बढतीवर तावा नाहीं. अधिकारी प्रधान मंडळास जवाबदार नसून ते गव्हरनरला जबाबदार आहेत. गव्हरनरलाही खास असे अधिकार दिलेले आहेत.

 एकंदर सामान्य व्यवस्था हिंदुस्थानसारखीच आहे. वयांत आलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाचा हक्क आहे. लोक राज्यकारभारांत विशेष लक्ष घालतात व याची कारणेही कांहीं विशेष अशी आहेत. हिंदुस्थानांत पुनर्विवाह व प्रौढविवाह नाहीं तेव्हा या सामाजिक गोष्टींत बरेच लक्ष कांहीं लोक घालतात. सीलोनमध्ये हे प्रश्नच नसल्यामुळे कोणालाही पुन र्विवाह व प्रौदविवाह यांचा विचार करण्यांत वेळ घालवावा लागत नाहीं. सीलोनमध्ये ब्राह्मण नसल्यामुळे भटांचे सोवळे ओवळे व भटशाही याबद्दल विद्वत्ताप्रचुर व मार्मिक लेख लिहून वृत्तपत्रकारांनां पोट भरतां येत नाहीं किंवा या विषयावर कौन्सिलमध्ये कोणाला चटकदार भाषण करून आपला लौकिक वाढविता येत नाही. यामुळे होतकरू व बुध्दिमान्, मनुष्यास राज कारणांतच मन घालावे लागते.

 सामान्य सिंहली मनुष्य हिंदुस्थानांतील सामान्य माणसापेक्षा जास्त ज्ञानवान् व देशांतील घडामोडींची जास्त माहीती असलेला असा आहे. एकदां तंजावर येथे कुचे, ब्रश, वगैरे विकणा-या सिंहली दुकानदाराकडे आह्मी गेलो होतो. तेव्हा त्या दुकानदाराने निरानराळ्या वेळी कोणकोणती कमिशनें बसली, त्यांनी राजकीय सुधारणेबद्दल काय काय रिपोर्टस केले, शाळाखाते कसे चालते वगैरेबद्दल आह्मांस अगदी बारीकसारीक माहीती सांगितली. 'सिंहलद्वीप सिंहली लोकांकरितां आहे' अशी सिंहला लोकांची घोषणा आहे व त्यामुळे ते हिंदुस्थानांतील लोकांचा द्वेष करितात. अलीकडे तर हिंदी लोकांवर बहिष्कार घालण्याची चळवळ चालू आहे' हिंदुस्थान आणि सीलोन ही अंगण आणि ओसरी याप्रमाणे अगदी एकासे एक जोडून आहेत तथापि तेथेही हिंदूचा द्वेष होतो.