पान:लंकादर्शनम्.pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९

उपयोग होतो. हिंदुस्थानांत यांत्रिक प्रगति बहुतेक नसल्यामुळे या थातूला यूरोप व जपान मधून विशेषतः मागणी येते.

 या वेटाच्या दक्षिण व मध्यभागीं लोखंड विपुल आहे. कित्येकदां अगदीं जमीनीजवळ उत्तम शुद्ध स्थितीत ते सांपडते. स्वीडनमधील उत्तम त-हेने तयार केलेल्या लोखंडासारखें सीलोनमधील अर्धवट तयार केलेले लोखंड असते.

 ईशान्यदिशेस हंबतोला जवळ हजारों टन मीठ तयार होते. कोलंबा अवळ पारा सांपडते. डच लोकांच्या ताब्यांत हे बेट असतांना येथून पुष्कळसा पारा यूरोपमध्ये जात असे. सध्यां, येथून फारसा पारा काढीत नाहींत.

 सोने व रुपें मात्र अगदी थोडे व क्वचित् सांपडते. सीलोनमध्ये तेल व कोळसा सांपडत नाहीं हाच काय तो मोठा दोष आहे. हे पदार्थ जर येथे सांपडते तर सीलोनची बरोबरी कोणत्याही देशास करितां आली नसती.

राज्यव्यवस्था


{{gap}]सीलोनही क्राऊन कालनी ( बादशाही वसाहत ) आहे. येथील गव्हरनरला सेक्रेटरी आफ स्टेट आफ कालनाज यांचे हुकमती खालीं काम करावे लागते. गव्हरनरच्या मदतीस एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल आहे. मुंबई इलाख्याप्रमाणे लोकनियुक्त अशा मंडळींचे कौन्सिल आहे. प्रधान मंडळही आहे. बेटाचे पांच भाग केले असून प्रत्येक भागावर इकडील कलेक्टर व अ. कलेक्टर यांच्या दर्जाचे अधिकारी आहेत.

 प्रस्तुतची राज्यघटना डुनोमोर कमिशनच्या शिफारशी प्रमाणे २० मार्च सन १९३१ रोजी अमलात आली. हिंदुस्थानास देऊ केलेल्या सुधारणा व सीलोनची प्रचलित पद्धति यांत पुष्कळच साम्य आहे. प्रधान मंडळाचा आफिसर्स आफ स्टेट (आधिकारी ) यांवर ताबा नाहीं. प्रधान