पान:लंकादर्शनम्.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१

 हिंदु लोक हिंदुस्थानाबाहेरील लोकांचा व्देष करीत नाहींत याबद्दल सिंहली हिंदूस दोषही देतात. याप्रकारची एक फार मजेदार हकीकत घडली ती पुढील प्रमाणे, एके दिवशी रात्री सुमारे ११ वाजता मी व श्री. वाघ कोलंबो येथे वेलावटीकडून सीसाइडकडे मोटारीने जावयास निघालों मोटारींत २४च माणसे होती, मोठार ड्रायव्हरने आम्हांसे विचारले तुह्मी गांधिजींचे लोक आहांत काय ? असा प्रश्न ठिकठिकाणी लोक आम्हांस विचारीत असत व हिंदुस्थानांतील राजकीय चळवळीबद्दल माहीती पुसत अंसत. आह्मी उत्तर दिलें कीं, “आह्मी गांधिजींचे अनुयायी नाही. आह्मास गांधिजी माहीती आहेत. सरकारने फार कडक कायदे केल्यामुळे गांधिजींच्या चळवळीची जोर कमी झाला आहे. मोटार ड्रायव्हर उसळून ह्मणाला सरकारला कांहीं करितां येणार नाह पण तुह्मी नेटाने काम करीत नाहीं.

 हिंदुस्थान हा हिंदूकरित आहे हैं तुम्हांस कळत नाहीं, तुमच्या देशांत कोणी परकी मनुष्य आला व पैसे मिळवू लागला तर तुह्मांस त्याबद्दल कांहींच वाटते नाहीं. आमच्या शेजारी एक मलबारी बसला होता त्याकडे चोट केरून ड्रायव्हर पुढे बोलू लागला. मी या भलवान्याचा व्देष करिता कां तर तो येथे काम करून पैसे मिळवितो व ते सर्व मलबारला पाठवितो. मी एथे काम करितो. पैसे मिळविल्यावर चैन केली तरी माझा पैसा एथेच राहते व मी मेल्यावर माझा पैसा माझ्याच देशांत राहील, तुह्मी आमच्याप्रमाणे परक्यांचा व्देष करण्यास शिका म्हणजे आम्ही सिंहली तुह्मांस मदत करू.

 या ड्रायव्हरच्या बोलण्यावरून सर्व साधारण सिंहली माणसाची विचारसरणी कोणत्या प्रकारची होत चालली आहे आणि भविष्यकाळी सिंहलव्दीपांत हिंदी लोकांची संभावना कशी केली जाणार आहे याची कल्पना येते.