पान:लंकादर्शनम्.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३६

हलक्या जातीचे लोक आहेत रोडिया ही तेथील अस्पृश्य जात. सीलोनमध्ये ब्राह्मण नाहींत. इ. स. पूर्वी ५४३ साली जेव्हां विजय तेथे गेला तेव्हां त्याचेवरोवर ब्राह्मण सीलोनमध्ये गेले नाहीत कारण त्यावेळी बंगालच्या बाजूस ब्राह्मणीधर्माने पुरेसा प्रवेश केलेला नव्हता.

 इ. स. पूर्वी २५० साली महेंद्र सीलोन येथे गेला व त्याने बुद्ध धर्माचा प्रसार केला पण त्या वेळींहीं ब्राम्हण किंवा ब्राम्हणी धर्म तेथे गेला नाहीं.

 सीलोन हिंदुस्थानच्या अगदी जवळ असूनही तेथे ब्राह्मणांचा प्रवेश झाला नाही. ब्राम्हण धर्माने जातिसंस्था उत्पन्न केली व अस्पृश्यता उत्पन्न केली असे जे लोक म्हणतात किंवा बुद्धानें जातिसंस्था नष्ट केली असे जे म्हणतात त्यांनी सीलोनच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास केल्यास तो फलदायी झाल्याशिवाय रहाणार नाही.

 खेडेगांवांत व सामान्य लोकांत धर्मभोळेपणाही बराच आहे. कोणतेही शुभकार्य करण्यास 'नखतराल' * ज्योतिषी बुवांची सल्ला घेतली जाते. मृतांच्या आत्म्यांची ( यक्षांची ) भीति सर्व लोकांस वाटते व त्यांची शान्ति करण्यास नाना तऱ्हेचे उपाय योजतात. रस्त्याचे कडेने रोवलेले पांढरे दगड असतात व त्यास "स्वामि" असे म्हणतात. हे स्वामि बहुधा पिंपळाच्या झाडाखाली असतात व त्या झाडासही स्वामि असे म्हणतात. येथे बौद्ध आणि हिंदु अर्चन पद्धतींचे मिश्रण दिसून येते. तामील लोक या स्वामीपुढे बोकड व कोंबडा यांचा बळी देतात.

 जन्म, विवाह व मृत्यु या सर्व प्रसंगी सिंहली लोकांत कांहीं धार्मिक विधि करितात. कॅडी प्रांतांतील सिंहली लोकांत विवाहाचे दोन प्रकार आहेत "बिन्न" नांवाच्या विवाहांत वर हा वधूच्या घरीं रहावयास जाता व "डिग" विवाहांत वधू वराच्या घरी जाते. सिंहली लोकांत घटस्फोट रूढ आहे. व्यभिचार, त्याग, किंवा वर व वधू यांची समति ही कारणे घट-


* नक्षत्रराज - या शब्दाचा अपभ्रंश