पान:लंकादर्शनम्.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३७

स्फोटास पुरेशी होतात.

 ईश्वरप्राप्तिकारिता किंवा देवास संतुष्ट करण्याकरितां देहदंड करण्याची फार चाल आहे. ता. ३ से १९३३ च्या टाइम्सच्या अंकांत या देहदंड करणारांचे उत्तम चित्र दिलेले आहे. गालांत, पाठींत वगैरे शरीराच्या निरनिराळ्या भागांत खिळे टोचून घेतात. ही देहदंडाची चाल दक्षिण हिंदुस्थानांत फार प्रचलीत आहे. या देहदंडाच्या चालीस 'अलगुगुथल' असे म्हणतात.

 आम्ही सीलोनमध्ये फारच थोडे दिवस होतो. त्यामुळे आम्हांला जिभेत, पाठींत किंवा गालांत खिळे व सुया टोचून घेणारे लोक भेटले नाहींत. गालांत किंवा जिभेत सुन्या टोचिल्यानंतर रक्ताचा थेंबही बाहर येत नाहीं हें आपण प्रत्यक्ष पाहिले आहे असे कित्येक इंग्रज लेखकांनी लिहलेले आहे.

लोकांचे मुख्य धंदे

 हिंदुस्थानप्रमाणे येथील लोक मुख्यतः शेतीवर आपली उपजीविका चालवितात. सर्वत्र भातजमीनी व फळबागा आढळून येतात. सुपारी व नारळ हे येथील अत्यंत महत्वाचे पीक आहे.

 मासळी पकडण्याचे काम किनाऱ्यालगत पुष्कळ मोठ्या प्रमाणावर चालते व हे काम करणारे कोळी बहुधा रोमनकॅथालिक पंथाचे आहेत. सीलोनच्या किनाऱ्यावर मासेही नानातऱ्हेचे आहेत. "गाणारा मासा" या नांवाचा एक मासा आहे. तो एक प्रकारचा आवाज काढू शकतो. एखादे तंतुवाद्य वाजविल्याप्रमाणे त्याचा आवाज असतो. चढणारे मासे पाण्याबाहेर पडून खडकावर इकडे तिकडे फिरतात. एखाद्या तलावांतील