पान:लंकादर्शनम्.pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३५

 खेडेगावातील लोकांचा मुख्य धंदा शेतीचा. पण या शेतक-यांना दुष्काळ मुळींच माहीत नाहीं. पीक हमखास , ठरलेले. बैलांच्या जाती हिंदुस्थानांतून नेलेल्या आहेत, म्हशीची जातही हिंदी दिसते. टोणग्यांचा व वैलांचा शेतीवर उपयोग केला जातो. इंग्लिश लोकांनी गाई आणिलेल्या आहेत पण त्यांचा प्रसार फारसा झालेला नाही.

 हिंदुस्थानांतील खेड्याभोंवतीं निवडुंग बहुधा असावयाचा, तसेच रानांत बाभळीही असावयाच्याच. सीलोनमध्ये खेड्याभोंवतीं निवडुंग सहसा दिसत नाहीं, व कोणीकडेही दृष्टी टाकली तरी निरुपयोगी झाड दिसत नाहीं. जिकडे दृष्टी टाकावी तिकडे केळी, नारळी, पोफळी यांचा गर्दी दिसते.

 शिक्षणाचा प्रसार बराच आहे. सुमारे शेकडा ६५ ते ७० लोक साक्षर आहेत. त्यामुळे बहुतेक गांवीं प्राथमिक शाळा आहे. हिंदुस्थानांत ब्राह्मण, तेली, मराठे, मांग असे सर्व जातीचे लोक एकाच खेड्यांत राहतात पण या वेटांत ‘गत्तरगाम’ ज्याला म्हणतात त्यांत सर्व अस्पृश्यवर्गीप्रमाणे अगदी कनिष्ठ जातीचेच लोक रहातात. गहलगामांत' हीन जातीचेच लोक रहातात. मूर गांवांत सर्व मूरच रहातात.

 उच्च जातीचा मनुष्य खालच्या जातीच्या हातचे जेवण जेवीत नाहीं, मग विवाहाचें नांवच नको. हिंदु मनुष्य नीच जातीतील व्यक्तीशी विवाह संबंध करीत नाही पण खिस्ती लोकांशी मात्र करतो. नवरा हिंदु व बायको खिस्ती, किंवा नवरा बुध्द तर स्त्री हिंदु किंवा खिस्ती असे विवाह होतात व विवाहोत्तर स्त्रीस किंवा पुरुषास आपला धर्म बदलावा लागत नाहीं. तसेच धर्म बदलणेही फार सोपे आहे. ख्रिस्ती माणसास गंध, भस्म वगैरे धारण करून केव्हांही हिंदु होतां येते. धर्म हा केवळ विश्वासाचा प्रश्न आहे असे मानले जाते.

 शेती करणारे लोक उच्च जातीय आहेत. वाजंत्री वाजविणारे