पान:लंकादर्शनम्.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 नंतर त्या गृहस्थास उगाच दोन चार प्रश्न विचारून आह्मी कॅपमध्ये परत आलो. कॅपमध्येच रेल्वेचे तिकिट ऑफिस आहे तेथे तिकिटे काढल्यावर आह्मी सर्वजण स्टेशनवर आलो. सकाळपासून एका तहच्या हडेलहप्पीमध्ये वेळ गेला, ऊनही पुष्कळ पडले होते, इकडून तिकडे खपाही ब-याच घालाव्या लागल्या यामुळे बहुत्तेक मंडळी दमली होती.

 कॅपपासून स्टेशन १।२ फर्लाग आहे तेथे आह्मी सुमारे ३॥ वाजता जाऊन पोहोंचलों लागलीच थोड्या वेळाने गाडी आली, तींत बसून आह्मी धनुष्यकोडीस निघालो. धनुष्यकोडी स्टेशन सुमारे ४ मैल आहे तेथे गेल्यावर गाडी अगदी धक्यापर्यंत गेली. बोट तयारच होती. तींत जाऊन बसलो. सायंकाळची वेळ होती तरी मनस्वी उकडत होते, बोट चालू होण्यास सुमारे तास दीड तास लागला. नंतर बोट सुटली आणि मग थोडे शांत वारे येऊ लागले, बोट २ तास चालल्यावर तालिमनार बंदरांत आली, धनुष्यकोडी आणि तालिमनार ही दोन्ही बंदरें अगदी वालुकामय प्रदेशावर आहेत त्यामुळे खाद्यपेय पदार्थ तेथे फारच महाग मिळतात.

 तालिमनार येथे पोहोचल्यावर कस्टम ऑफिसर बोटीवर आले व त्यांच्या तपासणीस सुरवात झाली, गाठोडी, टूका तर बघितल्याच पण जातांना आमच्या बरोबरच्या एका वृद्ध गृहस्थाचे खिसेही तपासले, एका वृद्ध बाईच्या हातांते मनिबॅग होती तिच्या हातास झोंबून काय आहे ते पाहण्याचे धारिष्टही एका वाईने केले. नंतर बोटीवरील पोलिस अधिकान्याने आम्हांस युरोपियन सार्जंटकडे नेले. त्याने तुम्ही कोठे जाणार कशाकारितां जाणार, तुमचे कोण लोक सीलोनमध्ये आहेत वगैरे प्रश्न विचारल्यानंतर आम्हास किती पैसे बरोबर आहेत ते दाखवा असे सांगितले प्रत्येक माणसाजवळ निदान १०० रु, तरी असावेत असा सामान्यतः नियम आहे. आह्मी आपल्या जवळचे पैसे दाखविले, नियमाप्रमाणे आमच्या