पान:लंकादर्शनम्.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



त्यावेळी तुम्ही त्यांचे कपडे निर्जन्तुक करितां कां? तसेच त्यांना देवी काढत कां असे प्रश्न विचारतांच डाक्टरनें कांहींच उत्तर दिले नाही. मीही तो प्रश्न धसास न लावतां परत आलो.

 यावेळी सुमारे १२ वाजले होते. जेवणाचे बोलावणे आले, आमची व्यवस्था ब्राम्हण स्वैपाक्याकडून केलेली होती. जेवणास केळीची पाने, भात, भाजी, सार, लिंबू, पापड व तूपही ब-यापैकी होते. हाटे लचे दोन कारकून मुद्दाम तेथे आले. एकजण आमचे सर्वं जेवण आटोपे पर्यंत आमच्या व्यवस्थेकरितां उभा होता. युरोपियन सेक्रेटरीही एकदां येऊन गेला. आम्हांस चांगले जेवण मिळावे म्हणून लोकांनी आपली पराकाष्ठाकेल्याचे दिसले. पण तिकडील तांदुळच बेंचव तथापि भूकं लागः ल्यामुळे जेवण बरे झाले.

 जेवण झाल्यानंतर तेथे हजर असलेल्या मद्रासी कारकुनास मी म्हणालो “कांहो तुम्ही किती बावळट, या कॅपमध्ये तुमच्या मद्रास इलाख्यांतीलच मजूर येतात. त्यांची जेवणाची व चहाची सोय 'स्पेम्सर आणि आणि कंपनी' ही इंग्लिश कंपनी करते. दिडकीचा चहा पाजून सवाआणा चार्ज करते, तसेच २-२|| आणे किमतीचे जेवणाबद्दल ५ आणे घेऊन पैसे मिळविते हे सर्व तुमच्या डोळ्या देखतच नव्हे तर तुमच्या कडून कारकुनी करवून पैसे मिळविते हे कसे काय आहे ? तम्हां मद्रास्यापैकी एखाद्यास ही खाणावळसुद्धा चालवितां येऊं नयें ? इतकेसुद्धा तुमच्या लोकात व्यापारी धाडस नाहीं ?"

 तो गृहस्थ हे शब्द ऐकून थोडा स्तंभित झाला व नंतर म्हणाला, आम्ही मद्रासी गरीब आहों. आमच्या लोंकांत इतका उरक नाहीं. पूर्वी येथे फारच त्रास असे तुमच्या प्रांतांतील लोक येथे येतात व तक्रारी करतात म्हणून निदान इतपत तरी व्यवस्था होत असते.